Lokmat Money > बिझनेस न्यूज > संशयास्पद जमा रकमेचा असा होणार तपास

संशयास्पद जमा रकमेचा असा होणार तपास

नोटाबंदीच्या काळात ५ लाखांपेक्षा जास्त रक्कम बँकांत जमा करणाऱ्या १८ लाख लोकांविरुद्ध केंद्रीय

By admin | Published: February 23, 2017 12:45 AM2017-02-23T00:45:44+5:302017-02-23T00:45:44+5:30

नोटाबंदीच्या काळात ५ लाखांपेक्षा जास्त रक्कम बँकांत जमा करणाऱ्या १८ लाख लोकांविरुद्ध केंद्रीय

Investigation of suspicious deposits will be investigated | संशयास्पद जमा रकमेचा असा होणार तपास

संशयास्पद जमा रकमेचा असा होणार तपास

नवी दिल्ली : नोटाबंदीच्या काळात ५ लाखांपेक्षा जास्त रक्कम बँकांत जमा करणाऱ्या १८ लाख लोकांविरुद्ध केंद्रीय थेट कर बोर्डाने कारवाई सुरू केली आहे. ‘आॅपरेशन क्लिन मनी’ अंतर्गत त्यांच्यावरील कारवाईचा पुढील मार्ग असा असेल.

२.५ लाख लाखांपेक्षा जास्त पैसे बँकेत भरले असल्यास चौकशी केली जाईल.
शेती किंवा अन्य स्वरूपाच्या सूट असलेल्या स्रोताचे उत्पन्न दाखवून बँकांत जमा केले असल्यास, त्या व्यक्तीच्या आधीच्या वर्षांतील रिटर्नमध्ये अशा प्रकारचे उत्पन्न आहे का, याची पडताळणी केली जाईल. जमिनीची माहिती घेतली जाईल.
बँकांतून किती पैसे काढले, याची तपासणी करण्यासाठी बँक स्टेटमेंट
मागितले जाईल.
तिसऱ्या व्यक्तीकडून बक्षिसाच्या स्वरूपात पैसे मिळाल्याचे दर्शविल्यास, त्यावर कर आकारला जाईल.
व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींकडील रोख रक्कम मार्च २0१६ पेक्षा कमी असल्यास स्पष्टिकरण मागितले जाणार नाही.

व्यवसाय/व्यापार

भरणा झालेली रक्कम नेहमीप्रमाणेच आहे का, हे मासिक विक्री, स्टॉक रजिस्टर नोंदी आणि बँक स्टेटमेंट्स याद्वारे तपासल्या जातील.
नोव्हेंबर-डिसेंबर २0१६ या काळातील विक्री आधीच्या विक्रीशी ताडून पाहिली जाईल.
३0 डिसेंबरच्या दरम्यान पाचशे आणि हजारांच्या नोटा एकापेक्षा जास्त वेळा भरल्या असल्यास त्याची चौकशी होणार
बोगस समभाग खरेदीची चौकशी केली जाईल.
अन्य संस्थांच्या खात्यांत पैसे वळते केले असल्यास, आधीचा इतिहास तपासला जाईल.

Web Title: Investigation of suspicious deposits will be investigated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.