Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजारातील एन्ट्रीसह गुंतवणूकदार मालामाल; ५६% प्रीमिअमवर लिस्ट झाला IPO, ₹८४ वर शेअर

शेअर बाजारातील एन्ट्रीसह गुंतवणूकदार मालामाल; ५६% प्रीमिअमवर लिस्ट झाला IPO, ₹८४ वर शेअर

प्लाझा वायर्स लिमिटेडचा आयपीओ आज शेअर बाजारात लिस्ट झाला. कंपनीच्या शेअर्सना बीएसई-एनएसईवर (BSE-NSE) जबरदस्त लिस्टिंग मिळालंय.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 02:57 PM2023-10-12T14:57:34+5:302023-10-12T14:58:15+5:30

प्लाझा वायर्स लिमिटेडचा आयपीओ आज शेअर बाजारात लिस्ट झाला. कंपनीच्या शेअर्सना बीएसई-एनएसईवर (BSE-NSE) जबरदस्त लिस्टिंग मिळालंय.

Investing in commodities including stock market entry; IPO listed at 56% premium, share at ₹84 | शेअर बाजारातील एन्ट्रीसह गुंतवणूकदार मालामाल; ५६% प्रीमिअमवर लिस्ट झाला IPO, ₹८४ वर शेअर

शेअर बाजारातील एन्ट्रीसह गुंतवणूकदार मालामाल; ५६% प्रीमिअमवर लिस्ट झाला IPO, ₹८४ वर शेअर

Plaza Wires IPO listing date today: प्लाझा वायर्स लिमिटेडचा आयपीओ आज शेअर बाजारात लिस्ट झाला. कंपनीच्या शेअर्सना बीएसई-एनएसईवर (BSE-NSE) जबरदस्त लिस्टिंग मिळालंय. आयपीओ प्राईज ₹54 च्या तुलनेत हा शेअर  बीएसई वर 55.56 टक्के प्रीमियमवर लिस्ट झाला. बीएसईवर त्याची लिस्टिंग किंमत 84 रुपये आहे. त्याच वेळी, हे शेअर्स एनएसईवर 40.74 टक्क्यांच्या प्रीमियमसह 76 रुपयांवर लिस्ट झाले. याचा अर्थ असा की ज्या गुंतवणूकदारांना हा आयपीओ अलॉट झाला असेल त्यांना पहिल्याच दिवशी जबरदस्त नफा झालाय.

प्लाझा वायर्सचा 71.28 कोटी रुपयांचा आयपीओ 29 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान खुला होता. या आयपीओला गुंतवणूकदारांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आणि हा आयपीओ एकूण 160.97 पट सबस्क्राइब झाला. यामध्ये, क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्सचा (QIB) हिस्सा 42.84 पट, नॉन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सचा (NII) हिस्सा 388.09 पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा हिस्सा 374.81 पट होता. या IPO अंतर्गत 10 रुपयांचे फेस व्हॅल्यू असलेले 13,200,158 नवीन इक्विटी शेअर्स जारी करण्यात आले आहेत. या शेअर्सच्या माध्यमातून उभारलेला पैसा नवीन प्लांट उभारण्यासाठी, खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरला जाणार आहे.

कसा आहे व्यवसाय?
प्लाझा वायर्सची (पूर्वीचे नवरत्न वायर्स) ची स्थापना 2006 मध्ये झाली. ही कंपनी वायर आणि एलटी अॅल्युमिनियम केबल्सचे उत्पादन आणि विक्री करते. याशिवाय ते फास्ट मूव्हिंग इलेक्ट्रिकल गुड्सची (FMEG) देखील विक्री करते. त्यांची उत्पादनं फ्लॅगशिप ब्रँड प्लाझा केबल्स आणि होम ब्रँड अॅक्शन वायर्स आणि पीसीजी अंतर्गत विकली जातात. इलेक्ट्रिक फॅनच्या आफ्टर सेल्स अंतर्गत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, हरयाणा आणि तामिळनाडूमध्ये त्यांची 20 हून अधिक सर्व्हिस सेंटर्स आहेत. सुमारे दोन वर्षांपूर्वी 2021 मध्ये त्यांनी मिनिएचर सर्किट ब्रेकर्स (MCB) आणि डिस्ट्रिब्युशन बोर्ड्स (DB) लाँच करून आपल्या उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार केला.

कंपनीच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर, त्यात सातत्यानं सुधारणा होत आहे. 2021 च्या आर्थिक वर्षात त्याचा निव्वळ नफा 4.24 कोटी रुपये होता, जो पुढील आर्थिक वर्ष 2022 मध्ये 5.95 कोटी रुपयांपर्यंत वाढला आणि आर्थिक वर्ष 2023 मध्ये तो 7.51 कोटी रुपयांवर पोहोचला.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलीये. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Web Title: Investing in commodities including stock market entry; IPO listed at 56% premium, share at ₹84

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.