Lokmat Money > बिझनेस न्यूज > करोडपती होण्यास कोणती योजना भारी?; 'या' योजनामंध्ये गुंतवणूक केल्यास पैसे होतील दुप्पट

करोडपती होण्यास कोणती योजना भारी?; 'या' योजनामंध्ये गुंतवणूक केल्यास पैसे होतील दुप्पट

पोस्ट ऑफिसच्या काही योजनामंध्ये गुंतवणूक केल्यास पैसे दुप्पट नक्की होऊ शकतात. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 07:49 AM2023-01-08T07:49:44+5:302023-01-08T07:49:59+5:30

पोस्ट ऑफिसच्या काही योजनामंध्ये गुंतवणूक केल्यास पैसे दुप्पट नक्की होऊ शकतात. 

Investing in some post office schemes can definitely double the money. | करोडपती होण्यास कोणती योजना भारी?; 'या' योजनामंध्ये गुंतवणूक केल्यास पैसे होतील दुप्पट

करोडपती होण्यास कोणती योजना भारी?; 'या' योजनामंध्ये गुंतवणूक केल्यास पैसे होतील दुप्पट

- चंद्रकांत दडस

अनेक गुंतवणूकदारांना शेअर बाजार, क्रिप्टोत गुंतवणूक करून रिस्क घेण्याची इच्छा नसते. याऐवजी ते बँका, पोस्ट ॲाफिस एफडी किंवा अन्य बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात. विशेषतः पोस्ट ऑफिसच्या काही योजनामंध्ये गुंतवणूक केल्यास पैसे दुप्पट नक्की होऊ शकतात.

नेमक्या कोणत्या योजना? 

१. ज्येष्ठ नागरिक बचत योजना
आता व्याजदर : वार्षिक ८ टक्के
पैसे दुप्पट करण्यासाठी वेळ : ९ वर्षे
या योजनेची मॅच्युरिटी ५ वर्षे आहे. 
कमाल ठेवीवर मर्यादा नाही
किमान ठेव १ हजार रुपये आहे. 
१.५० लाखांपर्यंत गुंतवलेल्या रकमेवर ८०सी अंतर्गत कर सूट.

२.टाइम डिपॉझिट (टीडी)
५ वर्षांच्या योजनेवर व्याज : ७% प्रतिवर्ष
पैसे दुप्पट करण्यासाठी वेळ : १०.२८ वर्षे
कमाल ठेवीवर मर्यादा नाही, तर किमान ठेव १ हजार रुपये आहे. 
१.५० लाखांपर्यंत गुंतवलेल्या रकमेवर ८०सी अंतर्गत कर सूट.

३.किसान विकास पत्र (केव्हीपी) 
आता व्याजदर : वार्षिक ७.२ टक्के
पैसे दुप्पट करण्यासाठी वेळ : १२० महिने
कमाल ठेवीवर मर्यादा नाही. 
किमान ठेव १ हजार रुपये आहे.

४. आरडी 
आता व्याजदर : ७ टक्के प्रतिवर्ष
५ वर्षांसाठी ५ हजार रुपये मासिक गुंतवणुकीवर रक्कम : ३,५९,६६७ रुपये
एकूण गुंतवणूक : ३ लाख

५. एनपीएस : परताव्याचे गणित 
गुंतवणूकदाराचे वय : ३० वर्षे
दरमहा गुंतवणूक : ५,००० रुपये
कालावधी : ३५ वर्षे (वय ६५ वर्षेपर्यंत)
अंदाजे परतावा : १२ टक्के 
एकूण गुंतवणूक रक्कम : २१ लाख रुपये
गुंतवणुकीवर परतावा : ३.०४ कोटी
एकूण कॉरपस : ३.२५ कोटी
एन्युटी खरेदी : ४० टक्के
वार्षिकीवरील अंदाजे परतावा : ६ टक्के 
निवृत्तीवर एकरकमी रक्कम : १.९५ कोटी
निवृत्तीनंतर मासिक पेन्शन : ६५ हजार रुपये

Web Title: Investing in some post office schemes can definitely double the money.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.