Join us  

करोडपती होण्यास कोणती योजना भारी?; 'या' योजनामंध्ये गुंतवणूक केल्यास पैसे होतील दुप्पट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2023 7:49 AM

पोस्ट ऑफिसच्या काही योजनामंध्ये गुंतवणूक केल्यास पैसे दुप्पट नक्की होऊ शकतात. 

- चंद्रकांत दडस

अनेक गुंतवणूकदारांना शेअर बाजार, क्रिप्टोत गुंतवणूक करून रिस्क घेण्याची इच्छा नसते. याऐवजी ते बँका, पोस्ट ॲाफिस एफडी किंवा अन्य बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात. विशेषतः पोस्ट ऑफिसच्या काही योजनामंध्ये गुंतवणूक केल्यास पैसे दुप्पट नक्की होऊ शकतात.

नेमक्या कोणत्या योजना? 

१. ज्येष्ठ नागरिक बचत योजनाआता व्याजदर : वार्षिक ८ टक्केपैसे दुप्पट करण्यासाठी वेळ : ९ वर्षेया योजनेची मॅच्युरिटी ५ वर्षे आहे. कमाल ठेवीवर मर्यादा नाहीकिमान ठेव १ हजार रुपये आहे. १.५० लाखांपर्यंत गुंतवलेल्या रकमेवर ८०सी अंतर्गत कर सूट.

२.टाइम डिपॉझिट (टीडी)५ वर्षांच्या योजनेवर व्याज : ७% प्रतिवर्षपैसे दुप्पट करण्यासाठी वेळ : १०.२८ वर्षेकमाल ठेवीवर मर्यादा नाही, तर किमान ठेव १ हजार रुपये आहे. १.५० लाखांपर्यंत गुंतवलेल्या रकमेवर ८०सी अंतर्गत कर सूट.

३.किसान विकास पत्र (केव्हीपी) आता व्याजदर : वार्षिक ७.२ टक्केपैसे दुप्पट करण्यासाठी वेळ : १२० महिनेकमाल ठेवीवर मर्यादा नाही. किमान ठेव १ हजार रुपये आहे.

४. आरडी आता व्याजदर : ७ टक्के प्रतिवर्ष५ वर्षांसाठी ५ हजार रुपये मासिक गुंतवणुकीवर रक्कम : ३,५९,६६७ रुपयेएकूण गुंतवणूक : ३ लाख

५. एनपीएस : परताव्याचे गणित गुंतवणूकदाराचे वय : ३० वर्षेदरमहा गुंतवणूक : ५,००० रुपयेकालावधी : ३५ वर्षे (वय ६५ वर्षेपर्यंत)अंदाजे परतावा : १२ टक्के एकूण गुंतवणूक रक्कम : २१ लाख रुपयेगुंतवणुकीवर परतावा : ३.०४ कोटीएकूण कॉरपस : ३.२५ कोटीएन्युटी खरेदी : ४० टक्केवार्षिकीवरील अंदाजे परतावा : ६ टक्के निवृत्तीवर एकरकमी रक्कम : १.९५ कोटीनिवृत्तीनंतर मासिक पेन्शन : ६५ हजार रुपये

टॅग्स :व्यवसायपोस्ट ऑफिस