Lokmat Money > बिझनेस न्यूज > हीच ती वेळ! 'या' १३ कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवा अन् उत्तम रिटर्न कमवा; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

हीच ती वेळ! 'या' १३ कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवा अन् उत्तम रिटर्न कमवा; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे शेअर बाजारात पडझड; 'या' १३ शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची उत्तम संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 11:41 PM2022-02-23T23:41:34+5:302022-02-23T23:41:52+5:30

आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे शेअर बाजारात पडझड; 'या' १३ शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची उत्तम संधी

investing in uncertain times sharekhan gaurav dua suggests these 13 stocks | हीच ती वेळ! 'या' १३ कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवा अन् उत्तम रिटर्न कमवा; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

हीच ती वेळ! 'या' १३ कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवा अन् उत्तम रिटर्न कमवा; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

युक्रेन-रशिया वादाचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात दिसून येत आहे. जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजारदेखील याला अपवाद नाही. गेल्या ३ महिन्यांत बीएसईवरील २७२ कंपन्यांचे शेअर्स २० टक्क्यांनी घसरले. तर याच कालावधीत सेन्सेक्स १.९९ टक्क्यांनी खाली आला.

शेअर बाजार तज्ज्ञ आणि शेयरखानचे कॅपिटल मार्केट रणनीतीतज्ज्ञ गौरव दुआ यांनी दिलेल्या माहितीनुसार बाजारात नुकतीच नोंदणी झालेल्या आणि अधिक मूल्य असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. नव्या कंपन्या आणि मिडकॅप आयटी स्टॉक सध्या तोट्यात आहेत. 

गेल्या ३ महिन्यांत पेटीएमचा शेअर ४० टक्क्यांनी, झोमॅटोचा शेअर ४६ टक्क्यांनी, नायकाचा शेअर ३६ टक्क्यांनी खाली आला आहे. भारतीय बाजारातील गुंतवणूक परदेशी गुंतवणूकदार काढून घेत आहेत. याशिवाय यूएस फेडनं व्याजदरात आक्रमक पद्धतीनं वाढ केली आहे. युक्रेन-रशियात युद्धजन्य स्थिती आहे. त्याचा फटका बाजाराला बसत आहे.

ज्यांची उलाढाल उत्तम आहे, अशा स्टॉक्समध्ये पैसे गुंतवल्यास जोखीम कमी असेल आणि परताव्याची जास्तीत जास्त खात्री असेल, असं गौरव दुआ यांनी सांगितलं. त्यांनी एकूण १३ स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. यामध्ये भारतीय स्टेट बँक (SBI), Bajaj Auto, Larsen & Toubro, Ultratech Cement, DLF आणि Divi’s Laboratories यांचा समावेश आहे. याशिवाय Oberoi Realty, Radico Khaitan, Jubilant Foodworks, Polycab, Persistent Systems, Healthcare Global Enterprise आणि Globus Spirits चे शअर्सदेखील उत्तम परतावा देऊ शकतात, असं दुआ यांनी सांगितलं.

(टीप- कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Web Title: investing in uncertain times sharekhan gaurav dua suggests these 13 stocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.