भविष्यात चार पैसे गाठीला असावेत यासाठी जो तो आपापल्या मिळकतीनुसार बचत करत असतो. त्यासाठी गुंतवणुकीचे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. अनेकांनी गुंतवणुकीला खूप आधीपासून सुरुवात केली असेल. तर कोणी अजून गुंतवणूक कुठे करावी, या विचारात असतील. काहीही असो. गुंतवणुकीसाठी काही सूत्रे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
५०-२०-३० नियम
यातील आकड्यानुसारच हे सूत्र स्पष्ट आहे. तुम्ही तुमच्याकडील रकमेचे तीन भाग करावे, असे यातून सुचवले आहे.
५०% रक्कम घरगुती करभरणा केल्यानंतर खर्चासाठी ठेवावी.
२०% रक्कम वेळप्रसंगी तयार ठेवावी.
३०% रक्कम भविष्यात खर्चासाठी राखून ठेवावी.
१५-१५-१५ सूत्र
दीर्घ कालावधीसाठी ज्यांना गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी हे सूत्र महत्त्वाचे.
या सूत्रात १५ वर्षांपर्यंत दरमहा १५ हजार रुपये अशा योजनेत गुंतवावे लागतात की ज्यावर दरसाल १५ टक्के परतावा अपेक्षित.
यातील जोखीम पाहता इक्विटीमधील गुंतवणूक योग्य आहे.
कारण चढ-उतारांनंतरही भांडवली बाजाराने दीर्घ कालावधीत १५ टक्के परतावा सुनिश्चित केला आहे.
७२चा नियम
हा नियम पैसे दुप्पट करण्यासाठी लागणारा कालावधी स्पष्ट करतो. प्रस्तावित परतावा किंवा व्याजदराला ७२ने भागावे. एसआयपीमधील गुंतवणुकीवर १५ टक्के परतावा मिळतो. त्यामुळे हीच रक्कम दुप्पट करणारा कालावधी निश्चित करण्यासाठी ७२ला १५ने भागावे. ज्याचे उत्तर ४.८ वर्ष एवढे असेल.
११४चे सूत्र
तुमची रक्कम तिप्पट होण्यासाठी किती कालावधी लागतो, हे निश्चित करणारे हे सूत्र आहे.
संभाव्य व्याजदराला ११४ने भागून हा कालावधी काढता येतो.
म्हणजेच गुंतवणुकीतून दरसाल १५% परतावा मिळत असेल तर तुम्हाला ११४ ला १५ने भागावे लागेल. ज्याचे उत्तर ७.६ वर्षे असे असेल.
१०० वजा सध्याचे वय
गुंतवणूक करतेवेळी १०० तून तुमचे सध्याचे वय कमी करावे. जी संख्या उरेल ती टक्केवारी असेल. त्या टक्केवारीनुसार तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करता येईल.