Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुंतवणुकीचा आजपासून ऊहापोह

गुंतवणुकीचा आजपासून ऊहापोह

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेली ‘मॅग्नेटिक महाराष्टÑ कन्व्हर्जन्स’ ही गुंतवणूक परिषद सोमवारपासून चर्चासत्रांच्या रूपात थाटात सुरू होत आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 02:23 AM2018-02-19T02:23:42+5:302018-02-19T02:23:47+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेली ‘मॅग्नेटिक महाराष्टÑ कन्व्हर्जन्स’ ही गुंतवणूक परिषद सोमवारपासून चर्चासत्रांच्या रूपात थाटात सुरू होत आहे.

Investing from today's uproar | गुंतवणुकीचा आजपासून ऊहापोह

गुंतवणुकीचा आजपासून ऊहापोह

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेली ‘मॅग्नेटिक महाराष्टÑ कन्व्हर्जन्स’ ही गुंतवणूक परिषद सोमवारपासून चर्चासत्रांच्या रूपात थाटात सुरू होत आहे. एकूण १६ चर्चासत्रांद्वारे १०१ वक्ते सहभागी होणार आहेत. त्यामध्ये देश-विदेशातील उद्योजक, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ या सर्वांचाच समावेश आहे. यामुळेच हे खºया अर्थाने उद्योग, आर्थिक क्षेत्र व रोजगारनिर्मितीचे ‘कन्व्हर्जन्स’ ठरेल, असा विश्वास एमआयडीसीचे सीईओ संजय सेठी यांनी व्यक्त
केला.
उद्योगासाठीची वातावरणनिर्मिती करणे हाच बीकेसतील एमएमआरडीए मैदानावरील ‘मॅग्नेटिक महाराष्टÑ कन्व्हर्जन्स’ या परिषदेचा मुख्य
उद्देश असल्याचे मत संजय सेठी
यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या
सदिच्छा भेटी वेळी मांडले. यासाठीच परिषदेत विविधांगी चर्चासत्रांचा समावेश करण्यात आल्याचे त्यांनी
स्पष्ट केले.
१० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी ४,५०० सामंजस्य करार होत असतानाच, ३५ लाख रोजगारनिर्मितीसंबंधी या सर्व चर्चासत्रांमध्ये विषय मांडला जाणार आहे. भविष्यातील ई व्हेहिकलसारखे नवीन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट आॅफ थिंग्स, पायाभूत सुविधा, स्मार्ट सिटी, निर्यात, सप्लाय चेन नियोजन, जल नियोजन, महिला उद्योजिका, इज आॅफ डुइंग बिझनेस, मेक इन महाराष्ट्र, प्रसारमाध्यमांचे भविष्य अशा एकाहून एक
उपयुक्त चर्चासत्रांचा यांत समावेश असेल.

अशी होतील चर्चासत्रे
१९ फेब्रुवारी सकाळी १९ ते ११.३० : १. ई-वाहने २. भविष्यातील नोकºया ३. पायाभूत सुविधा १२ ते १.३० : १. इंटरनेट आॅफ थिंग्स २. निर्यात ३. सप्लाय चेन २.३० ते सायंकाळी ५ : महाराष्टÑाचे व्हिजन (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस) सायंकाळी ५.३० ते ७.३० : स्टार्ट अप पुरस्कार वाटप सायंकाळी ७.३० ते ९ : महाउद्योग रत्न पुरस्कार २० फेब्रुवारी सकाळी १० ते ११.३० : १. जल संवर्धन २. महिला उद्योजिका ३. इज आॅफ डुइंग बिझनेस दुपारी १२ ते १.३० : १. मुंबई वित्त हब २. लघू-मध्यम उद्योग ३. मेक इन महाराष्ट्र दुपारी २.३० ते ४ : १. प्रसारमाध्यमांचे भविष्य २. रोजगारक्षम उद्योग ३. उद्योग-शिक्षण दुपारी ४.३० : समारोप

देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यात महाराष्टÑाची भूमिका कायम आघाडीची राहिली आहे. यामुळेच महाराष्टÑातील गुंतवणुकीसाठी असलेल्या या परिषदेसाठी केंद्रीय मंत्रीही आवर्जून येत असल्याची माहिती संजय सेठी यांनी या वेळी दिली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हे मुंबईला वित्तीय हब करण्यासंबंधी विचार मांडतील. रस्ते परिहवनमंत्री नितीन गडकरी, वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू, कौशल्य विकासमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबतच सद्गुरू जग्गी वासुदेव हेही मार्गदर्शन करणार आहेत.

मुख्यमंत्री स्वत:
करणार मार्गदर्शन
परिषदेत १९ व २० तारखेला विविध चर्चासत्रे होत आहेत. त्यात सोमवारी दुपारी २.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राला ‘ट्रिलियन’ अर्थव्यवस्था करण्याबाबत विचार मांडणार आहेत.

Web Title: Investing from today's uproar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.