Lokmat Money > बिझनेस न्यूज > Investment: असे करा प्लानिंग, की साठीतही कॉलर टाईट!

Investment: असे करा प्लानिंग, की साठीतही कॉलर टाईट!

Investment: नोकरी संपल्यानंतर काय करायचे याबाबत अनेकांनी काहीही ठरवलेले नसते. त्या काळात आपण आपले कुटुंब यांचा उदरनिर्वाह कसा चालणार याबाबत कसलाही विचार केलेला नसतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 11:13 AM2023-09-13T11:13:38+5:302023-09-13T11:13:50+5:30

Investment: नोकरी संपल्यानंतर काय करायचे याबाबत अनेकांनी काहीही ठरवलेले नसते. त्या काळात आपण आपले कुटुंब यांचा उदरनिर्वाह कसा चालणार याबाबत कसलाही विचार केलेला नसतो.

Investment: Do this planning, even for the collar tight! | Investment: असे करा प्लानिंग, की साठीतही कॉलर टाईट!

Investment: असे करा प्लानिंग, की साठीतही कॉलर टाईट!

नवी दिल्ली : नोकरी संपल्यानंतर काय करायचे याबाबत अनेकांनी काहीही ठरवलेले नसते. त्या काळात आपण आपले कुटुंब यांचा उदरनिर्वाह कसा चालणार याबाबत कसलाही विचार केलेला नसतो. निवृत्त झाल्यानंतर जागे होऊन याबाबत विचार किंवा नियोजन करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही. त्या काळातील गरजांचा विचार करून आधीच खर्चासाठी तजवीज करून ठेवावी लागते तरच साठीनंतरच्या काळातही तुम्हाला ताठ मानेने जगता येते. 

लवकर सुरुवात करा 
गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात की, भविष्यासाठी पैसे बाजूला काढणे किंवा बचतीसाठी लवकरात लवकर सुरुवात केली पाहिजे. यासाठी मिळकत वाढण्याची वाट पाहू नये. तुमच्या अगदी पहिल्या कमाईपासूनच काही पैसे भविष्यासाठी बाजूला ठेवणे तुम्ही सुरू केले पाहिजे. 

लक्ष्य निश्चित करा 
तुम्ही निवृत्त होणार तेव्हा असलेली आर्थिक परिस्थिती, तुमच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्ती आणि त्या अनुषंगाने होणारे खर्च किती असतील याचे आडाखे बांधून किती पैसे तुमच्याजवळ असायला हवेत हे निश्चित केले पाहिजे. त्यानुसार आधीपासून नियोजन केले पाहिजे.  

शिस्तपालन गरजेचे 
ठरलेली रक्कम बाजूला काढून ठेवण्यासाठी काटकसर करावी लागते. वायफळ खर्च टाळावे. येणाऱ्या मिळकतीमधून काही उदाहरणार्थ जर मासिक उत्पन्न २० रुपयांचे असेल तर त्यातून दोन हजार रुपये भविष्यासाठी बाजूला काढलेचे गेले पाहिजेत.  

सरकारी योजनांचा लाभ घ्या
भविष्यासाठी गुंतवणूक करावयाची असेल नेहमी सरकारी गुंतवणूक योजनांचा लाभ घ्या. 
नॅशनन पेंशन प्लान (एनपीएस) तसेच व्यक्तिगत भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ) या योजनांमध्ये न चुकता गुंतवणूक करावी. 
यातून तुम्हाला अखेरीस एक मोठी रक्कम हातात मिळते. सरकारी योजना असल्यामुळे हा पैसा बुडित जाण्याची चिंता नसते.  

प्लानची सतत पडताळणी करीत राहा
nभविष्याचा विचार करून केलेली गुंतवणूक पुरेशी आहे की नाही, त्यात वाढ करणे गरजेचे आहे काय हे सतत ताडून पाहिले पाहिजे. 
nयातून मिळणारा परताव्यापेक्षा अधिक फायदा देणाऱ्या अन्य कोणत्या योजना बाजारात उपलब्ध आहेत का, एसआयपी, म्युच्युअल फंड आदींमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल काय, याचीही पडताळणी करीत राहिले पाहिजे. 
nतुमच्या प्लानमध्ये काही न्यून राहिले असेल तर त्यात वेळीच सुधारणा केली पाहिजे.

 

Web Title: Investment: Do this planning, even for the collar tight!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.