Lokmat Money > बिझनेस न्यूज > परदेशी गुंतवणूकदारांचा भारतावर विश्वास; वर्षभरात केली 1.62 लाख कोटींची गुंतवणूक

परदेशी गुंतवणूकदारांचा भारतावर विश्वास; वर्षभरात केली 1.62 लाख कोटींची गुंतवणूक

गेल्या काही वर्षांमध्ये परदेशी गुंतवणूकदारांचा भारतावरील विश्वास वाढताना दिसतोय.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 01:29 PM2023-12-24T13:29:46+5:302023-12-24T13:30:56+5:30

गेल्या काही वर्षांमध्ये परदेशी गुंतवणूकदारांचा भारतावरील विश्वास वाढताना दिसतोय.

Investment in India: Foreign investors trust on India; 1.62 lakh crores investment made during the year | परदेशी गुंतवणूकदारांचा भारतावर विश्वास; वर्षभरात केली 1.62 लाख कोटींची गुंतवणूक

परदेशी गुंतवणूकदारांचा भारतावर विश्वास; वर्षभरात केली 1.62 लाख कोटींची गुंतवणूक

Investment in India: गेल्या काही वर्षांमध्ये परदेशी गुंतवणूकदारांचाभारतावरील विश्वास वाढताना दिसतोय. अलीकडेच पाच राज्यात निवडणुका पार पडल्या, यात बहुमताचे सरकार आणि निवडणुकीत राजकीय स्थैर्याची शक्यता लक्षात घेता, या महिन्यात आतापर्यंत भारतीय शेअर बाजारात 57,300 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक झाली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रमुख निर्देशकांमधील वाढ आणि आर्थिक वाढीची ताकद दर्शविणारी आकडेवारी, यामुळे परदेशी गुंतवणूकदारांचा भारतावरील विश्वासही वाढत आहे.

या संपूर्ण वर्षभराबद्दल बोलायचे झाले तर आत्तापर्यंत भारतीय बाजारपेठेत विदेशी गुंतवणुकीच्या रुपाने 1.62 लाख कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक झाली आहे. जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार व्ही.के.विजयकुमार यांच्या मते, नवीन वर्षात यूएस व्याजदरात घट होण्याची अपेक्षा आहे आणि अशा परिस्थितीत FPIs 2024 साली भारतीय बाजारपेठेत त्यांची खरेदी वाढवू शकतात.

या महिन्यात 57 हजार कोटी आले
आकडेवारीनुसार, या महिन्यात FPIs ने भारतीय इक्विटी मार्केटमध्ये आतापर्यंत 57,313 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. एका महिन्यात त्यांची वर्षभरातील ही सर्वाधिक गुंतवणूक आहे. यापूर्वी, FPIs ने ऑक्टोबरमध्ये 9,000 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली होती. डिपॉझिटरी डेटावरुन असे दिसून आले आहे की, परदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात 39,300 कोटी रुपये काढले होते.

नेमकं काय कारण?
भारतीय बाजारपेठेतील FPIs च्या जोरदार आवकसाठी अनेक घटक कारणीभूत ठरू शकतात. मॉर्निंगस्टार इन्व्हेस्टमेंट रिसर्च इंडियाचे सह-संचालक आणि संशोधन व्यवस्थापक हिमांशू श्रीवास्तव यांच्या मते, राजकीय स्थिरतेचे वातावरण आणि भारतीय बाजारपेठांमधील सकारात्मकतेने यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. देशाची स्थिर आणि मजबूत अर्थव्यवस्था, कॉर्पोरेट कमाईतील प्रभावी वाढ आणि बर्‍याच कंपन्यांच्या वारंवार येणारे IPO, यांनी परदेशी गुंतवणूकदारांना भारताकडे आकर्षित केले आहे.

या क्षेत्रातही वाढ 
बाँड्सबद्दल बोलायचे तर, या काळात भारतीय लोन बाजारात 15,545 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. याआधी नोव्हेंबरमध्ये 14,860 कोटी रुपये आणि ऑक्टोबरमध्ये 6,381 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. FPIs ने वित्तीय सेवा क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक केली आहे, तर त्यांनी वाहने, भांडवली वस्तू आणि दूरसंचार यांसारख्या क्षेत्रांमध्येही रस दाखवला आहे.

Web Title: Investment in India: Foreign investors trust on India; 1.62 lakh crores investment made during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.