नवी दिल्ली: साधारणपणे सोन्यात गुंतवणूक करणे चांगले मानले जाते. जास्त परतावा मिळवण्यासाठी अनेकजण लोक म्युच्युअल फंडामध्येही गुंतवणूक करत असतात. पण, येणाऱ्या काळात चांदी म्युच्युअल फंड आणि सोन्यापेक्षा कितीतरी पट जास्त परतावा देऊ शकते. चांदीमध्ये गुंतवणूक केली तर तुम्ही येणाऱ्या काळात मालामाल होऊ शकता.
भारतासह जगभरात व्याजदर वाढण्याची शक्यता आहे. इक्विटी मार्केटमध्ये कधीही पडझड होऊ शकते. बाजार विश्लेषकांचा असा विश्वास आहे की, या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत कोरोना महामारी संपल्यानंतर अनिश्चितता कमी होईल, त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक कमी होऊ शकते. तेजी पाहून लोक चांदीकडे आकर्षित होतील.
चांदी 1.50 लाखांपर्यंत पोहोचेल
2022 आणि पुढील काही वर्षात चांदी तेजीत राहण्याची अपेक्षा आहे, असे विश्लेषकांचे मत आहे. केडिया अॅडव्हायझरीचे व्यवस्थापकीय संचालक अजय केडिया सांगतात की, यावर्षी चांदी 80,000 रुपयांपर्यंत पोहोचेल. यानंतर, 2024 पर्यंत, ती 1.50 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते. चांदी सध्या 61,000 च्या आसपास आहे. म्हणजे 2024 पर्यंत 33 टक्के आणि 250 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकते.
या कारणांमुळे तेजी
अजय केडिया सांगतात की, चांदीच्या खाणकामात मागणीइतका पुरवठा होत नाहीये. 2018-20 पर्यंत चांदीच्या खाणकामात सातत्याने घट होत आहे. ऑटोमोबाईल, सौर आणि इलेक्ट्रिक वाहन उद्योगांमधून चांदीची अतिरिक्त मागणी होत आहे. त्यात वर्षानुवर्षे सातत्याने वाढ होत आहे. याशिवाय अमेरिका हरित तंत्रज्ञानाला पाठिंबा देत आहे. पर्यावरणपूरक तंत्रज्ञानामध्ये चांदीचा अधिक वापर केला जातो.
मागणी 30 टक्क्यांपर्यंत वाढू शकते
गेल्या पाच वर्षांपासून चांदीची जागतिक मागणी सातत्याने वाढत असल्याचा दावा लंडनस्थित सिल्व्हर इन्स्टिट्यूटने केला आहे. मात्र, महामारीमुळे 2020 मध्ये मागणी नव्हती. याउलट, 2017 पासून चांदीच्या खाणकामात सातत्याने घट होत आहे. त्याची नोंदणी 2021 मध्येच झाली होती. आकडेवारीनुसार, 2022-24 मध्ये चांदीची मागणी 25-30 टक्क्यांनी वाढेल.