नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी चालविण्यात येणाऱ्या आणि १० वर्षे हमखास आठ टक्के परतावा देणाºया ‘प्रधानमंत्री वय वंदन योजने’ची गुंतवणूक मर्यादा ७.५ लाख रुपयांवरून वाढवून दुप्पट म्हणजे १५ लाख रुपये करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने ही गुंतवणूक मर्यादा वाढविण्यास मंजुरी दिली. एवढेच नव्हे, तर या योजनेची मुदत ४ मे २०१८ रोजी संपणार होती. ती आता मार्च २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे. यामुळे पूर्वी ज्यांनी या योजनेत ७.५ लाख रुपये ठेवले आहेत, त्यांना आता तेवढीच रक्कम पुन्हा गुंतविता येईल. जे नव्याने रक्कम ठेवतील, त्यांना एकरकमी १५ लाख रुपये गुंतविता येतील. या योजनेत ७.५ लाख रुपये गुंतविल्यास १० वर्षे दरमहा पाच हजार रुपये व १५ लाख रुपये ठेवल्यास दरमहा १० हजार रुपये ‘पेन्शन’ मिळते, तसेच १० वर्षांनी गुंतविलेली रक्कम परत मिळते. गुंतवणूकदार १० वर्षांच्या आधी मरण पावल्यास, पेन्शन बंद होऊन, गुंतविलेली रक्कम त्याच्या ‘नॉमिनी’ला परत मिळते.
वय वंदन योजनेमध्ये गुंतवणूक मर्यादा १५ लाख
भारतीय आयुर्विमा महामंडळातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी चालविण्यात येणाऱ्या आणि १० वर्षे हमखास आठ टक्के परतावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 05:16 AM2018-05-03T05:16:12+5:302018-05-03T05:16:12+5:30