नवी दिल्ली- आई-वडील मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नेहमीच गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय शोधत असतात. सरकारकडूनही अशा अनेक योजना ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ज्यात तुम्ही छोटीशी गुंतवणूक केल्यास त्या तुम्हाला चांगला फायदा मिळवून देतात. तसेच मुलांच्या सुरक्षित भवितव्यासाठीही सरकारच्या अशा काही योजना आहेत, त्यात तुम्ही गुंतवलेले पैसे मुलांच्या भविष्यात निर्णायक ठरतात.
दिवाळीपासूनच तुम्ही सरकारच्या अशा छोट्या छोट्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करा, जेणेकरून तुम्ही लखपती होऊ शकता, असा सल्ला तज्ज्ञ देतात. त्यामुळे तुम्ही आतापासूनच मुलांच्या सुरक्षित भवितव्यासाठी गुंतवणूक केली, तर ती मुलं नोकरीला लागण्याआधीच करोडपती होतील. तसेच या पैशाचा त्यांना त्यांच्या आयुष्यात उपयोग होऊ शकतो. बऱ्याचदा मुलांच्या शिक्षणामुळे त्यांच्या भवितव्यासाठी गुंतवणूक करणं अवघड होऊन जातं. परंतु त्यातून तुम्ही मार्ग काढत छोटी छोटी गुंतवणूक केली, तर तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. तुम्ही जर मुलांसाठी एखाद्या छोट्याशा योजनेत जरी गुंतवणूक केली, तरी त्यांना मोठा फायदा मिळतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. या गुंतवणुकीच्या पैशातून मुलं स्वतःचं करिअरही घडवू शकतात. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. परंतु त्यासाठी थोडं नियोजन करण्याची गरज आहे.
- कुठे कराल गुंतवणूक- तुम्हाला दीर्घकाळ गुंतवणूक करून फायदा मिळवण्यासाठी अनेक योजना आहेत. परंतु म्युचुअल फंडात तुम्ही गुंतवलेल्या पैशांचा चांगला परतावा येतो. जवळपास डझनांहून जास्त अशा म्युचुअल फंडाच्या योजना आहेत. ज्या तुम्हाला 50 टक्क्यांहून अधिक फायदा मिळवूत देतात. या म्युचुअल फंडात गुंतवणूक केल्यास तुम्हाला 12 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो. दर महिन्याला तुम्ही 1400 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता.
- कसे वाढतात पैसे- बऱ्याचदा ही छोटी छोटी गुंतवणूक आपल्याला केव्हा करोडपती बनवते हे समजतही नाही. सुरुवातीला गुंतवलेल्या रकमेवरचा परतावा कमी मिळतो. परंतु कालांतरानं तुम्हाला यावर जास्त फायदा मिळण्यास सुरुवात होते. त्यानंतर या फंडात गुंतवलेले पैसे वेगाने वाढतात. अशा प्रकारे महिन्याला 1400 रुपयांची गुंतवणूक केल्यास पाच वर्षांतच तुमचे पैसे 1.5 लाखांच्या वर जातात. त्यानंतर 10 वर्षांत ही गुंतवणूक 5 लाखांच्याही पार जाते. 15 वर्षांत हीच गुंतवणूक 16 लाखांवर जाते. तर 20व्या वर्षी ही केलेली गुंतवणूक 42 लाखांएवढी होते. 25 वर्षांत ही 1400 रुपयांची केलेली गुंतवणूक 1 कोटींच्या वर जाते.
- या रकमेवर टॅक्स लागणार काय ?- प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, इक्विटी म्युचुअल फंडात दीर्घकाळासाठी केलेल्या गुंतवणुकीत तुम्हाला टॅक्समधूनही सूट मिळते. या फंडांमधल्या गुंतवणुकीवर वर्षानंतर कोणताही टॅक्स लागत नाही. त्यामुळे या पैशांवर कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यात जोखीम असल्यानं सर्व सुरक्षिततेची काळजी घेऊनच गुंतवणूक करावी.