Lokmat Money > बिझनेस न्यूज > म्युच्युअल फंडांची गुंतवणूक घटली

म्युच्युअल फंडांची गुंतवणूक घटली

अर्थसंकल्पात लावण्यात आलेल्या दीर्घकालीन भांडवली नफ्याचा (एलटीसीजी) म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर परिणाम झाला आहे. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यातील गुंतवणुकीत ३.९८ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:37 AM2018-03-13T00:37:58+5:302018-03-13T00:37:58+5:30

अर्थसंकल्पात लावण्यात आलेल्या दीर्घकालीन भांडवली नफ्याचा (एलटीसीजी) म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर परिणाम झाला आहे. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यातील गुंतवणुकीत ३.९८ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.

The investment of mutual funds decreased | म्युच्युअल फंडांची गुंतवणूक घटली

म्युच्युअल फंडांची गुंतवणूक घटली

मुंबई : अर्थसंकल्पात लावण्यात आलेल्या दीर्घकालीन भांडवली नफ्याचा (एलटीसीजी) म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर परिणाम झाला आहे. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यातील गुंतवणुकीत ३.९८ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. असोसिएशन आॅफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या (एएमएफआय) अहवालात हा आकडा समोर आला आहे.
जानेवारी अखेरीस म्युच्युअल फंडांत जुन्या १८८० व नवीन ३० योजना मिळून, देशभरात २० लाख ५५ हजार ३४९ कोटींची गुंतवणूक झाली. केंद्रीय अर्थसंकल्पात दीर्घकालीन भांडवली नफ्याची मुदत दोन वर्षांवरून एक वर्ष आणण्याचा निर्णय अर्थमंत्र्यांनी जाहीर केला. त्याची अंमलबजावणीही तत्काळ करण्यात आली. याचा भांडवली बाजारात नफा कमविणाºयांना फटका बसणार, हे निश्चित होते.

Web Title: The investment of mutual funds decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.