Join us

₹७२००० ची करा गुंतवणूक आणि कमवा २,११,७९,४८३ रुपये; SIPची जादू, जबरदस्त नफा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2023 10:18 AM

तुम्ही स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करुन भविष्यासाठी मोठा निधी तयार करू शकता.

How to become crorepati: पहिलं टार्गेट लखपती आणि दुसरं कोट्यधीश, हे बहुधा प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण, खऱ्या हे तेव्हाच साकार होऊ शकतं जेव्हा तुम्ही स्मार्ट गुंतवणूक करता. योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं आणि योग्य वेळी गुंतवणूक करणं खूप महत्त्वाचं आहे. यासोबतच इकडे-तिकडे खर्च होणारा पैसा योग्य ठिकाणी गुंतवला तर तुमची उद्दिष्ट्ये वेळेत पूर्ण होतील, हेही समजून घेणं आवश्यक आहे. यासाठी अनेक पारंपारिक पर्याय आहेत आणि बाजारातील जोखीमेच्या अंतर्गत देखील पर्याय उपलब्ध आहेत. याद्वारे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करुन तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता.

200 रुपये वाचवल्यास किती बनेल पैसाफायनान्शिअल प्लॅनर्सच्या म्हणण्यानुसार दररोज 200 रुपये म्हणजेच एका महिन्यात 6000 रुपयांची गुंतवणूक पुरेशी आहे. जर आपण एका वर्षाचा हा आकडा पाहिला तर त्यात तुमचे 72,000 रुपये जमा होतात. आता हेच 72000 रुपये कुठेतरी गुंतवले तर... आधी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) आणि दुसरे SIP म्युच्युअल फंड्सबद्दल समजून घेऊ.

15 वर्षांत पीपीएफमध्ये गुंतवणूकएक कन्झर्व्हेटिव्ह गुंतवणूकदार त्याचे पैसे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) सारख्या सरकारी पर्यायांमध्ये. त्याची खासियत आहे – गुंतवलेले पैसे – त्यावर मिळणारं व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळणारी संपूर्ण रक्कम करमुक्त आहे. तुम्ही पीपीएफमध्ये दरमहा 6000 रुपये गुंतवल्यास तुमची गुंतवणूक एका वर्षात 72,000 रुपये होईल. नियमितपणे गुंतवणूक केल्यास ही रक्कम 15 वर्षांच्या कालावधीत 19 लाख 52 हजार 740 रुपये होईल. PPF चा किमान मॅच्युरिटी पीरिअड 15 वर्षांचा आहे.

20 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास...ही रक्कम तुम्ही पीपीएफमध्ये 20 वर्षांसाठी जमा करत राहिल्यास ही रक्कम 31 लाख 95 हजार 978 लाख रुपये होईल. आता त्यात आणखी 5 वर्षांची वाढ केली तर 49 लाख 47 हजार 847 रुपये मिळतील. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पीपीएफ ही एक सुरक्षित गुंतवणूक आहे. परंतु, दर तीन महिन्यांनी त्याचा व्याजदर निश्चित केला जातो. येथे आम्ही सध्याच्या 7.1 टक्के व्याजदरानुसार गणना केली आहे.

म्युच्युअल फंडात 6 हजारांची गुंतवणूक केल्यासतुम्ही तुमचे पैसे म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये 25 वर्षे दरमहा जमा केल्यास, तुमच्या गुंतवणुकीचं मूल्य 80 लाख 27 हजार 342 रुपये होईल. येथे आम्ही 10 टक्के वार्षिक परताव्यानुसार गणना केली गेली आहे. आता ती वाढवून 30 वर्षे केली तर परतावा 1 कोटी 36 लाख 75 हजार 952 रुपये होईल.

10 टक्के परतावा हा अतिशय सामान्य असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. डायव्हर्सिफाईड फंडात 12 टक्के रिटर्न मिळणं सामान्य आहे. यानुसार 25 वर्षात ही रक्कम 1 कोटी 13 लाख 85 हजार 811 रुपये आणि 30 वर्षांत ही रक्कम वाढून 2 कोटी 11 लाख 79 हजार 483 रुपये होईल.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूकपैसा