Lokmat Money > बिझनेस न्यूज > Investment: गुंतवणुकीची माे SSठ्ठी संधी! पुढील सहा महिन्यांत येणार २३ आयपीओ, एक लाख कोटी जमा करणार

Investment: गुंतवणुकीची माे SSठ्ठी संधी! पुढील सहा महिन्यांत येणार २३ आयपीओ, एक लाख कोटी जमा करणार

Investment opportunities: गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजारात तेजीचे वारे वाहत आहे. यामुळे अनेक कंपन्या शेअर बाजारात उतरण्याच्या तयारीत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 07:14 AM2023-06-28T07:14:00+5:302023-06-28T07:14:44+5:30

Investment opportunities: गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजारात तेजीचे वारे वाहत आहे. यामुळे अनेक कंपन्या शेअर बाजारात उतरण्याच्या तयारीत आहेत.

investment opportunities! 23 IPOs will come in the next six months, raising one lakh crore | Investment: गुंतवणुकीची माे SSठ्ठी संधी! पुढील सहा महिन्यांत येणार २३ आयपीओ, एक लाख कोटी जमा करणार

Investment: गुंतवणुकीची माे SSठ्ठी संधी! पुढील सहा महिन्यांत येणार २३ आयपीओ, एक लाख कोटी जमा करणार

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजारात तेजीचे वारे वाहत आहे. यामुळे अनेक कंपन्या शेअर बाजारात उतरण्याच्या तयारीत आहेत. पुढील ६ ते ७ महिन्यांत २३ कंपन्या आयपीओच्या माध्यमातून बाजारातून एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमविण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना मालामाल होण्याची संधी आहे.
नुकसान होण्याची भीती किती? 
२०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये आयपीओंना अपेक्षा अधिक आहेत. यंदा आयपीओंमधून दमदार रिटर्न मिळण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे यंदा नुकसान होण्याची शक्यता कमी आहे.
गेल्या वर्षी काय झाले? 
गेल्या वर्षी एलआयसी आणि डेलिव्हरीसारख्या मोठ्या कंपन्यांच्या आयपीओंनी आतापर्यंत गुंतवणूकदारांचे ६७ टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. असे असले तरी अदानी विल्मर, रुची सोया आणि हरिओम पाइप्ससारख्या आयपीओंनी ३२१ टक्क्यांपर्यंत रिटर्न्स दिले आहेत.

१८ वर्षांनंतर टाटाचा आयपीओ
n टाटा समूह जवळपास १८ वर्षांनंतर आयपीओ बाजारात आणत आहे. टाटा समूहाची कंपनी टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडला आयपीओच्या माध्यमातून रक्कम जमा करण्यासाठी सेबीकडून मंजुरी मिळाली. 
n टाटा टेक्नॉलॉजी वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा मोटर्सची उपकंपनी आहे.  ती २३.६०% म्हणजेच ९.५७ कोटी शेअर्स विकणार आहे. यापूर्वी टाटाने २००४ मध्ये टीसीएसचा आयपीओ आणला होता. 

    या कंपन्यांमध्ये करता येईल गुंतवणूक    सुरू    बंद     
    ड्रोन कंपनी आयडियाजफोर्ज टेक्नॉलॉजी    २६ जून    २९ जून
    हॉस्पिटॅलिटी पीकेएच व्हेंचर    ३० जून    ४ जुलै
    प्लास्टिक फर्म ग्लोबल पेट इंडस्ट्रीज    २९ जून    ३ जुलै
    टेक कंपनी सिनोप्टिक्स टेक्नोलॉजी    ३० जून    ५ जुलै
    आयटी कंपनी सायंट डीएलएम     २७ जून    ३० जून
    रबर कंपनी पेंटागन रबर     २६ जून    ३० जून
    टेक कंपनी त्रिध्या टेक    ३० जून    ५ जुलै

Web Title: investment opportunities! 23 IPOs will come in the next six months, raising one lakh crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.