- उमेश शर्मा(चार्टर्ड अकाउंटंट)अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, लोकसभा निवडणुकीचे निकाल आले आहेत. निवडणुकीचे अनिश्चिततेचे वातावरण आता संपले आहे. सामान्य माणसाने गुंतवणुकीच्या निर्णय घेण्यापूर्वी काय जाणून घ्यायला हवे?कृष्ण (काल्पनिक पात्र) : नवीन सरकार सत्तेत आले आहे. कोणत्या क्षेत्रांमध्ये चांगले रिटर्न्स मिळाले आहेत ते पाहण्याची ही चांगली संधी आहे. मागील कार्यकाळात PSU क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली, ज्यांनी लवकर गुंतवणूक केली होती त्यांना चांगला परतावा मिळाला. मागील वर्षाच्या आकडेवारीनुसार, निफ्टी PSU क्षेत्राने ८०% परतावा दिला, तर काही शेअर्सने १५०% - ३००% पेक्षा अधिक परतावा दिला.अर्जुन : ज्यांनी गुंतवणूक केली नाही ते कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करावे ?कृष्ण : काही प्रमुख मुद्दे असे-१. अर्थव्यवस्था : भारताला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट.२. इन्फ्रास्ट्रक्चर : लक्षणीय वाढ अपेक्षित आहे.३. रेल्वे : बुलेट ट्रेन आणि वंदे भारत ट्रेनची विक्रमी संख्या.४. डिफेन्स : भारतीय कंपन्यांकडून विक्रमी डिफेन्स संबंधित निर्यात.५. सौरऊर्जा : हर घर सोलर उपक्रमाअंतर्गत प्रत्येक घरात सौर पॅनेल बसवण्याचे उद्दिष्ट.६. अंतरिक्ष क्षेत्र : अंतरिक्ष क्षेत्रातील वाढीव क्रियांची अपेक्षा.७. ईव्ही उत्पादन : विक्रमी उच्च उत्पादन अपेक्षित.८. ग्रीन हायड्रोजन आणि सेमिकंडक्टर : या क्षेत्रात नवीन वाढीची अपेक्षा. या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या ओळखण्यापासून सुरुवात करावी. PSU शेअर्सवर विशेष लक्ष द्यावे कारण ते बहुधा प्रकाशझोतात असतात. आयटी आणि ऑटोसारख्या इतर क्षेत्रांवरही लक्ष केंद्रित करावे. कॅनडा आणि इंग्लंडमध्ये अलीकडे व्याजदरात कपात झाल्यामुळे आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून तशी शक्यता असल्याने आयटी क्षेत्राला अधिक संधी आहे. ऑटो क्षेत्र देखील ईव्ही उत्पादनातील वाढ आणि भारतातील मजबूत ग्राहक मागणीमुळे विक्रमी विक्री अनुभवत आहे.
Investment: निवडणुकीनंतर गुंतवणुकीच्या संधी !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 9:07 AM