Join us

मिळणार गुंतवणूकीची संधी, येतोय आणखी एका एनर्जी कंपनीचा IPO; ₹३००० कोटी उभारण्याची योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 11:46 AM

जर तुम्ही IPO मध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.

Waaree Energies IPO: जर तुम्ही IPO मध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. लवकरच आणखी एका कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होईल. दरम्या, सोलार पॅनल तयार करणारी कंपनी वारी एनर्जीजनं IPO द्वारे निधी उभारण्याची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीनं शुक्रवारी बाजार नियामक सेबीकडे कागदपत्रं दाखल केली.सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (SEBI) दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार, आयपीओमध्ये एकूण ३ हजार कोटी रुपयांचे फ्रेश इक्विटी शेअर्स आणि प्रवर्तक तसंच विद्यमान भागधारकांद्वारे ३२ लाख इक्विटी शेअर्सचा ऑफर फॉर सेलचा (OFS) समावेश आहे.कुठे खर्च करणार?फ्रेश इश्यूमधून मिळालेले पैसे ओडिशात सहा गिगावॅट इनगॉट वेफर, सोलर सेल आणि सोलर पीव्ही मॉड्यूल निर्मिती सुविधा उभारण्यासाठी वापरले जातील. याशिवाय, एक भाग सामान्य कॉर्पोरेट कामासाठी वापरला जाईल. वारी एनर्जीज ही भारतातील सोलार एनर्जी उद्योगातील आघाडीची कंपनी आहे. कंपनीने सप्टेंबर २०२१ मध्ये सेबीकडे आयपीओसाठी कागदपत्रं देखील दाखल केली होती, परंतु त्यानंतर आपओचा निर्णय पुढे ढकलण्यात आला.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगगुंतवणूक