Join us

Investment Tips: गुंतवणूकीचे बेस्ट ऑप्शन्स, ५ वर्षांत देतील जबरदस्त नफा; पाहा किती मिळेल व्याज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 11:25 AM

पाहा कोणते आहेत हे पर्याय आणि किती मिळतंय त्यावर व्याज.

आजच्या काळात, बहुतेक लोक गुंतवणूकीला प्राधान्य देतात कारण गुंतवणूक हा एकमेव मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही तुमचा पैसा वेगाने वाढवू शकता. प्रत्येक व्यक्ती आपलं उत्पन्न लक्षात घेऊन गुंतवणुकीचा पर्याय निवडते. जर तुम्ही असा पर्याय शोधत असाल जिथून तुम्हाला कमी वेळेत चांगला परतावा मिळेल, तर आम्ही तुम्हाला असे गुंतवणुकीचे पर्याय सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्हाला फक्त ५ वर्षात तुमच्या पैशावर चांगला परतावा मिळू शकेल.

पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीमजर तुम्हाला एकरकमी पैसे जमा करायचे असतील तर तुम्ही पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटचा पर्याय निवडू शकता. तुम्ही पोस्ट ऑफिस एफडीमध्ये १, २, ३ आणि ५ वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. पण तुम्हाला चांगला परतावा हवा असेल तर ५ वर्षांसाठी गुंतवणूक करा. पोस्ट ऑफिसमध्ये ५ वर्षांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला ७.५ टक्के दरानं व्याज मिळेल. तर २ आणि ३ वर्षांसाठी ७ टक्के आणि १ वर्षासाठी ६.९ टक्के व्याज मिळेल. जर तुम्हाला ५ वर्षांसाठी २ लाख रुपयांची एफडी करायची असेल तर तुम्हाला मॅच्युरिटीवर तुम्हाला २,८९,९९० रुपये मिळतील. अशा प्रकारे तुम्हाला ५ वर्षांमध्ये उत्तम नफा मिळू शकेल.

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटनॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचा लॉक-इन कालावधी कमीत कमी पाच वर्षांचा असतो म्हणजेच तुम्ही पाच वर्षांच्या गुंतवणुकीनंतरच पैसे काढू शकाल. एनएससीमधील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे. यामध्ये, चक्रवाढ व्याज दिलं जातं आणि हमी परतावा मिळतो. सध्या यावर ७.७ टक्के दराने व्याज मिळत आहे. या योजनेत तुम्ही किमान १ हजार रुपये गुंतवू शकता आणि तुम्ही १०० च्या पटीत पैसे गुंतवू शकता. गुंतवणुकीच्या रकमेची मर्यादा नाही. समजा तुम्ही त्यात २ लाख रुपये गुंतवले तर ७.७ टक्के व्याजदरानुसार, तुम्हाला मॅच्युरिटीवर २,८९,८०७ रुपये मिळतील.रिकरिंग डिपॉझिटतुम्ही दर महिन्याला पैसे जमा करण्याची योजना शोधत असाल, तर तुम्ही रिकरिंग डिपॉझिट स्कीम निवडू शकता. तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये कुठेही आरडी सुरू करू शकता. तुम्ही बँकेत १, २, ३, ४ किंवा ५ वर्षांसाठी ते उघडू शकता, परंतु पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला किमान 5 वर्षांसाठी आरडी खाते उघडावं लागेल. मॅच्युरिटी नंतर तुम्हाला व्याजासह पैसे मिळतील. आरडी मध्ये, तुम्हाला दरमहा एक निश्चित रक्कम जमा करावी लागेल, ज्यावर तुम्हाला व्याज मिळते. वेगवेगळ्या बँकांमध्ये त्याचा व्याजदर वेगवेगळा आहे, परंतु तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये आरडीवर ६.५ टक्के व्याज मिळेल. तुम्ही पोस्ट ऑफिस आरडीमध्ये दर महिन्याला ५००० रुपये गुंतवल्यास, तुम्ही ५ वर्षांत एकूण ३,००,००० रुपये गुंतवाल. सध्याच्या व्याजदरांनुसार, तुम्हाला मॅच्युरिटीवर ३,५४,९५७ रुपये मिळतील.

म्युच्युअल फंडजर तुम्ही काही जोखीम पत्करू शकत असाल तर तुम्ही एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. यामध्ये कोणताही निश्चित परतावा नाही, परंतु तज्ज्ञांच्या मते साधारणत: यात सरासरी १२ टक्के परतावा मिळतो. जर तुम्ही यात ५ वर्षांसाठी दरमहा ५,००० रुपये गुंतवले, तर तुम्ही ५ वर्षांत ३,००,००० रुपये गुंतवाल आणि ५ वर्षांनंतर १२ टक्के दरानं ४,१२,४३२ रुपये परतावा मिळू शकतात.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूकपैसा