Lokmat Money > बिझनेस न्यूज > Investment Tips: कमी वेळात पाहिजे जास्त नफा? तर बेस्ट आहेत 'हे' ऑप्शन्स, ५ वर्षांत मिळेल जबरदस्त रिटर्न

Investment Tips: कमी वेळात पाहिजे जास्त नफा? तर बेस्ट आहेत 'हे' ऑप्शन्स, ५ वर्षांत मिळेल जबरदस्त रिटर्न

असे बरेच लोक आहेत ज्यांना अशा स्कीम्समध्ये गुंतवणूक करणं आवडतं जिथे त्यांना खात्रीशीर परतावा मिळू शकेल. त्यांच्यासाठी हे पर्याय बेस्ट ठरू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 10:44 AM2024-01-18T10:44:45+5:302024-01-18T10:45:11+5:30

असे बरेच लोक आहेत ज्यांना अशा स्कीम्समध्ये गुंतवणूक करणं आवडतं जिथे त्यांना खात्रीशीर परतावा मिळू शकेल. त्यांच्यासाठी हे पर्याय बेस्ट ठरू शकतात.

Investment Tips Want more profit in less time post office options are the best you will get tremendous returns in 5 years | Investment Tips: कमी वेळात पाहिजे जास्त नफा? तर बेस्ट आहेत 'हे' ऑप्शन्स, ५ वर्षांत मिळेल जबरदस्त रिटर्न

Investment Tips: कमी वेळात पाहिजे जास्त नफा? तर बेस्ट आहेत 'हे' ऑप्शन्स, ५ वर्षांत मिळेल जबरदस्त रिटर्न

Investment Tips: आजच्या काळात, लोकांकडे गुंतवणुकीसाठी एसआयपीसारखे पर्याय आहेत, ज्यामध्ये चांगला परतावा मिळतो. परंतु तरीही असे बरेच लोक आहेत ज्यांना अशा स्कीम्समध्ये गुंतवणूक करणं आवडतं जिथे त्यांना खात्रीशीर परतावा मिळू शकेल. जर तुम्ही देखील अशी योजना शोधत असाल तर आम्ही तुम्हाला असे गुंतवणुकीचे पर्याय सांगत आहोत ज्यामध्ये तुम्हाला तुमचे पैसे खूप काळासाठी ठेवावेही लागणार नाहीत. इतकंच नाही तर तुम्ही गुंतवलेल्या पैशावर चांगलं व्याजही मिळेल. जाणून घ्या त्या पोस्ट ऑफिसच्या स्कीम ज्या ५ वर्षात खूप चांगला परतावा देऊ शकतात.

पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे. त्याला पोस्ट ऑफिस एफडी असंही म्हणतात. तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये १,२, ३ आणि ५ वर्षांसाठी एफडीचा पर्याय मिळतो, परंतु तुम्हाला ५ वर्षांच्या एफडीवर सर्वाधिक नफा मिळतो. सध्या या ५ वर्षांच्या एफडीवर ७.५ टक्के दरानं व्याज मिळत आहे. याशिवाय ५ वर्षांच्या एफडीमध्येही टॅक्स बेनिफिट्सही मिळतात. म्हणून याला टॅक्स सेव्हिंग एफडी असंही म्हणतात.

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट

सुरक्षित आणि हमी परताव्याच्या शोधात असलेल्या गुंतवणूकदारांसाठी उत्तम पर्याय म्हणजे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. किमान १००० रुपयांच्या गुंतवणूकीपासून पोस्ट ऑफिसच्या या स्कीमचा लाभ घेता येतो. ही स्कीम ५ वर्षांत मॅच्युअर होते. सध्या या स्कीममध्ये ७.७ टक्क्यांचं व्याज दिलं जातं. यामध्ये वार्षिक आधारावर व्याज दिलं जातं. परंतु मॅच्युरिटीनंतरच संपूर्ण रक्कम तुम्हाला मिळते. या स्कीममध्ये आयकरच्या कलम ८० सी अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंतची सूट मिळते.

सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीम

ज्येष्ठ नागरिक बचत योजना म्हणजे SCSS (Senior Citizen Savings Scheme) ही ज्येष्ठ नागरिकांसाठी एक उत्कृष्ट योजना आहे, ज्यांना अधिक चांगला आणि हमी परतावा मिळतो. यामध्ये किमान १००० रुपये आणि जास्तीत जास्त ३० लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. ही योजना देखील ५ वर्षांनी मॅच्युअर होते. सध्या त्यावर ८.२ टक्के दरानं व्याज दिलं जात आहे. जमा केलेल्या रकमेवर तिमाही आधारावर व्याज दिलं जातं. याशिवाय ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतही कर सवलतीही मिळतात. 

६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. याशिवाय, ५५-६० वयोगटातील लोक ज्यांनी व्हीआरएस घेतली आहे आणि निवृत्त संरक्षण कर्मचारी, ज्यांचं वय किमान ६० वर्षे आहे, ते या योजनेत गुंतवणूक करू शकतात.

Web Title: Investment Tips Want more profit in less time post office options are the best you will get tremendous returns in 5 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.