Join us

Investment Tips: गुंतवणुकीची सुवर्ण संधी! ₹४०० चा शेअर २१₹वर विकला जातोय; खरेदीचा जोर वाढला, त्वरा करा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 6:28 PM

Investment Tips: या बँकेच्या शेअरने रॉकेट स्पीड पकडला असून, गेल्या दोन सत्रांत २० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

Investment Tips: शेअर मार्केटमध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळत असतात. असे असले तरी अनेकविध क्षेत्रातील कंपन्या आपले आयपीओ सादर करताना दिसतात. काही कंपन्या दमदार कामगिरी करून गुंतवणूकदारांना मालामाल करतात. यातच एका बँकिंग क्षेत्रातील एका शेअरची मागणी वाढली असून, गुंतवणूकदारांच्या खरेदीसाठी उड्या पडत असल्याचे सांगितले जात आहे. या बँकेच्या शेअरची घसरण थांबली असून, या शेअरने मोठ्या प्रमाणात उसळी घेतल्याचे सांगितले जात आहे. 

एकेकाळी येस बँकेचे नाव आघाडीच्या खाजगी बँकांमध्ये घेतले जायचे. त्यावेळी शेअर बाजारावरयेस बँकेच्या शेअर्सला प्रचंड मागणी होती. पण काळ बदलला आणि बँकेचे वाईट दिवस सुरू झाले. काही वर्षांपूर्वी बॅलेन्स शीटमध्ये गडबड आणि एनपीएमध्ये घोळ झाल्यामुळे रिझर्व्ह बँकेने येस बँकेविरोधात कारवाई सुरू केली होती. याचा मोठा फटका बँकेच्या शेअरला बसला होता. बँकेच्या शेअर्समधील घसरण इतकी वाईट होत की, ४०० रुपयांच्या किंमतीला विकला जाणारा शेअर आता २१ रुपयांवर पोहोचला. बँकेचा व्यवसाय पुन्हा एकदा सुधारला असल्याने त्याचा परिणाम शेअर्सवरही दिसू लागला आहे.

बँकेच्या शेअर्समध्ये २० टक्क्यांनी घसघशीत वाढ

येस बँकेच्या शेअर्सने गेल्या दोन ट्रेडिंग दिवसांपासून वेग पकडला आहे. शेअरला अप्पर सर्किट लागले आहे. बँकेचे शेअर्स ७ टक्क्यांपर्यंत वाढून २१ रुपयांवर व्यवहार करत होते. याआधी शुक्रवारी बँकेचे समभाग १४ टक्क्यांपेक्षा अधिक वाढले. येस बँकेचे शेअर्स गेल्या दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये २० टक्के वाढले. या स्टॉकबाबत तज्ज्ञ सकारात्मक आहेत आणि बँकिंग स्टॉकमध्ये वाढ होत राहण्याची अंदाज वर्तवला जात आहे. 

दरम्यान, रिझर्व्ह बँकेने खाजगी इक्विटी गुंतवणूकदार कार्लाइल ग्रुप आणि ॲडव्हेंट इंटरनॅशनल यांना येस बँकेत ९.९९ टक्क्यांपर्यंत अधिग्रहण करण्यास सशर्त मान्यता दिली. यानंतर बँक, कार्लाइल ग्रुप आणि ॲडव्हेंटसह, अंतिम मंजुरी मिळवण्यासाठी अटींची पूर्तता जलद करण्यासाठी आरबीआयशी संपर्क साधेल. आरबीआयच्या पुढाकाराने अडचणीत असलेल्या येस बँकेला वाचवण्यासाठी कार्लाइल ग्रुप आणि ॲडव्हेंट २०२० मध्ये पुढे सरसावले. या योजनेंतर्गत येस बँकेतील कंपन्यांनी केलेली गुंतवणूक ही अलिकडच्या वर्षांतली सर्वात मोठी बँकिंग गुंतवणूक असल्याचे सांगितले जात आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :शेअर बाजारयेस बँकगुंतवणूक