नवी दिल्ली - सध्या शेअर बाजारात जोरदार तेजीचे वातावरण आहे. गुंतणूकदारांची जोरदार कमाई होताना दिसत आहे. परंतु बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची मानली जाते. यामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्यायांचा अवलंब करणे कधीही हिताचे ठरते. डेट फंड, कॅपिटल गेन टॅक्स आदी पर्यायांसोबत सध्या जाणकार विशेष करून मल्टी ॲसेट फंडांमध्ये गंतवणुकीचा सल्ला देत आहेत.
६५% गुंतवणूक इक्विटीमध्ये, १० टक्के सोने आणि २५ टक्के डेट सिक्युरिटीज ही योग्य रणनीती असल्याचे सर्वसामान्यपणे मानले जाते. मल्टि ॲसेट फंडांसाठी विभागणी वेगळी असते.
१०% कमीतकमी गुंतवणूक किमान ३ ॲसेट वर्गातील शेअर्समध्ये करणे हे मल्टी ॲसेट फंडांसाठी बंधनकारक असते. म्हणजे इक्विटी, डेट फंड आणि सोने किंवा अन्य फंडांत किमान १० टक्के गुंतवणूक करणे बंधनकारक असते.
मल्टी ॲसेट फंडांनी असा दिला परतावा
स्कीम १ वर्ष ३ वर्ष ५ वर्ष
आयसीआयसीआय मल्टी ॲसेट २१.५% ३४.६% २१.८%
यूटीआय मल्टी ॲसेट फंड १८.६% १५.१% १०.७%
एसबीआय मल्टी एलोकेशन १६.७% १५.८% १४.७%
क्वांट मल्टी ॲसेट फंड १४.२% ३७.६% ३५.४%
एचडीएफसी मल्टी ॲसेट फंड १३.७% १७.३% १४.२%
ॲसेट लोकेशन कसे आहे?
स्कीम इक्विटी डेट सोने/अन्य
आयसीआयसीआय मल्टी ॲसेट ६४.५% १४.९% २१.५%
यूटीआय मल्टी ॲसेट फंड ६६.९% १५.९% १७.२%
एसबीआय मल्टी एलोकेशन ४६.४% १९.३% ३४.३%
क्वांट मल्टी ॲसेट फंड ४१.०% १०.७% ३४.३%
एचडीएफसी मल्टी ॲसेट फंड ६६.५% १३.३% २०.२%