Join us  

Investment: दरमहा मिळेल 1 लाख रुपये व्याज, 'या' योजनेत गुंतवणूक केल्यास होईल मोठा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 5:58 PM

खाजगी नोकरी करणारी व्यक्ती असो किंवा सरकारी नोकरी, प्रत्येकालाच आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्याची चिंता असते. भविष्यातील चिंता दूर करण्यासाठी आतापासूनच बचत करणे गरजेचे आहे.

खाजगी नोकरी करणारी व्यक्ती असो किंवा सरकारी नोकरी, प्रत्येकालाच आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्याची चिंता असते. सरकारने 2004 नंतर भरती झालेल्या लोकांना पेन्शनची तरतूद रद्द केली आहे. अशा स्थितीत निवृत्तीनंतरचे नियोजन आजपासूनच करणे शहाणपणाचे ठरेल. यासाठी आतापासूनच गुंतवणूक सुरू करा.

महिन्याला पैसे जमा करामहागाई दर दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे निवृत्तीनंतरच्या कालावधीसाठी तुम्ही दरमहा किमान 1 लाख रुपये व्याज किंवा उत्पन्नाची व्यवस्था करणे महत्त्वाचे आहे. निवृत्तीनंतर, 1 लाख रुपयांच्या उत्पन्नासह उदरनिर्वाह करण्यासाठी आतापासून दरमहा काही पैसे जमा करणे सुरू करा.

बँकांचा सरासरी व्याजदर 5 टक्के आहेसध्या व्याजदर सर्वात खालच्या पातळीवर चालू आहे. बँकांचा सरासरी व्याजदर 5 टक्के आहे. भविष्यात हा कमी होण्याची शक्यता नाही. यानुसार, तुमच्याकडे दरमहा 1 लाख रुपयांच्या व्याजासाठी 2.40 कोटींचा निधी असणे आवश्यक आहे. निवृत्तीच्या वेळी हा फंड तयार करण्यासाठी, SIP हा सध्या सर्वोत्तम गुंतवणुकीचा पर्याय आहे.

15 टक्के सरासरी परतावासमजा तुमचे वय 30 वर्षे आहे, तुम्ही महिन्याला किमान 3500 रुपयांची SIP सुरू केली. तर, गेल्या 10 वर्षांचा रेकॉर्ड पाहता, अनेक SIP ने सरासरी 15 टक्के परतावा दिला आहे. हा परतावा आधार म्हणून घेऊन, पुढील गणना केली जाईल.

दरमहा 3500 रुपये गुंतवा30 वर्षे दरमहा 3500 रुपये गुंतवून तुम्ही 12.60 लाख रुपये गुंतवता. यावर, जर तुम्हाला दरवर्षी सरासरी 15 टक्के परतावा मिळत असेल, तर 30 वर्षे पूर्ण झाल्यावर ही रक्कम 2 कोटी 45 ​​लाख रुपये होईल. या रकमेवर वार्षिक 5 टक्के व्याज आणि दरमहा 1 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज आहे.

परताव्याच्या आधारावर 10 वर्षांचे सर्वोत्कृष्ट म्युच्युअल फंड आणि त्यांचा परतावा1. SBI स्मॉल कॅप म्युच्युअल फंड : 20.04 टक्के2. निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना : 18.14 टक्के3. इन्वेस्को इंडिया मिडकॅप म्युच्युअल फंड योजना : 16.54 टक्के4. कोटक इमर्जिंग इक्विटी म्युच्युअल फंड योजना : 15.95 टक्के5. डीएसपी मिडकॅप म्युच्युअल फंड योजना: 15.27 टक्के

महत्वाचे: आम्ही तुम्हाला गुंतवणुकीबाबत माहिती देत आहोत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञाचा सल्ला आवश्य घ्या.

 

टॅग्स :गुंतवणूक