मुंबई : मे महिन्यामुळे भारतीय शेअर बाजारात जरी मोठे चढउतार अनुभवण्यास मिळत असले, तरी गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडाकडे ओढा झपाट्याने वाढत असून, एप्रिल २०१६च्या अखेरीस म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेने १४.२२ लाख कोटी रुपयांचा उच्चांक नोंदविला आहे.
देशातील ४४ म्युच्युअल फंड कंपन्यांची शिखर संस्था असलेल्या अॅम्फीकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेअर बाजारातील अस्थिरतेच्या वातावरणात भांडवली बाजाराचे लाभ प्राप्त करून देणाऱ्या म्युच्युअल फंड योजनांकडे ग्राहकांचा ओढा सातत्याने वाढताना दिसत असून, एप्रिल महिन्यात म्युच्युअल फंडांच्या इक्विटी आणि डेट अशा दोन प्रकारांत तब्बल
१ लाख ७० हजार कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक झाली आहे. हादेखील गेल्या दशकभरातील उच्चांकच ठरला आहे. याखेरीज मर्यादित काळासाठी पैसे गुंतवून त्यावर लाभ देणाऱ्या लिक्वीड आणि मनी मार्केट फंडालाही उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. या दोन्ही प्रकारांत मिळून तब्बल १ लाख ३४ हजार कोटी रुपयांची नवी गुंतवणूक झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या चार वर्षांपासून गुंतवणूकदारांची पसंती असलेल्या गोल्ड ईटीएफ योजनेला मात्र गळती लागताना दिसत आहे. या योजनेतून गुंतवणूकदारांनी किरकोळ असे ६९ कोटी रुपये काढून घेतले असले तरी एका महिन्यात एवढी मोठी रक्कम या योजनेतून काढली जाणे हे या योजनेला प्रतिसाद कमी होण्याचे संकेत मानले जात आहेत.
म्युच्युअल फंडातील या वाढत्या प्रतिसादाचे विश्लेषण करताना बाजार विश्लेषक अजित राममूर्ती म्हणाले की, म्युच्युअल फंडाकडे वाढणाऱ्या या ओघामागे दोन प्रमुख कारणे आहेत. पहिले म्हणजे, मार्च महिन्यात केंद्र सरकारने फिक्स्ड इन्कम देणाऱ्या विविध योजनांतील व्याजदरात कपात केली. त्यामुळे नाराज झालेल्या अनेक लोकांनी म्युच्युअल फंडाला पसंती दिल्याचे दिसते. या ग्राहकांनी पसंती ही प्रामुख्याने मर्यादित काळात उत्तम परतावा देणाऱ्या लिक्वीड योजनांना दिल्याचे दिसते. तर याचसोबत सध्या बाजारात पडझड सुरू असल्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकात घसरण होतानाच अनेक उत्तम कंपन्यांचे समभाग आकर्षक किमतीला उपलब्ध झाले आहेत. याचा दीर्घकालीन फायदा घेण्याच्या दृष्टीने अनेक लोकांनी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून इक्विटी योजनांत सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या माध्यमातून गुंतवणुकीस सुरुवात केली आहे. दरम्यान, गेल्या आर्थिक वर्षात म्युच्युअल फंडांच्या लिक्वीड, डेट, इक्विटी अशा विविध घटकांनी सरासरी १२ ते १८ टक्क्यांच्या दरम्यान परतावा दिल्याचे दिसून आले
आहे. तसेच, म्युच्युअल फंड कंपन्यांच्या ग्राहकसंख्येतही लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांत केवळ मेट्रो शहरांतील ग्राहकांचीच संख्या अधिक नाही, तर आता यामध्ये द्वितीय श्रेणी व नागरी तसेच ग्रामीण भागांतील गुंतवणूकदारही झपाट्याने सहभागी होताना दिसत आहेत. (प्रतिनिधी)
म्युच्युअल फंडाची खरेदी करा आॅनलाइन
सध्या म्युच्युअल फंड योजनेची खरेदी करायची झाल्यास एजंट किंवा वित्तीय सल्लागारामार्फत ती करावी लागते.
या घटकाचे कमिशन हा यातील कळीचा मुद्दा आहे.
मात्र, आता केवायसी (नो युअर कस्टमर)ची प्रक्रिया आॅनलाइन झाल्यानंतर म्युच्युअल फंड कंपन्यांनीही आपल्या योजनांची विक्री आॅनलाइन उपलब्ध केली आहे.
ग्राहकाला त्याच्या पसंतीच्या योजनेची थेट खरेदी करता येते. यामुळे कमिशनमध्येही मोठ्या प्रमाणावर बचत होते.
एप्रिल 2016 च्या अखेरीस म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेने १४.२२ लाख कोटी रुपयांचा उच्चांक नोंदविला आहे.
गेल्या आर्थिक वर्षात म्युच्युअल फंडांच्या लिक्टीड, डेट, इक्विटी अशा विविध घटकांनी सरासरी
12-18%च्या दरम्यान परतावा दिल्याचे दिसून आले आहे.
एप्रिल महिन्यात म्युच्युअल फंडांच्या इक्विटी आणि डेट अशा दोन प्रकारांत तब्बल170000cr
रुपयांची नवीन गुंतवणूक झाली आहे.
मार्च महिन्यात केंद्र सरकारने फिक्स्ड इन्कम देणाऱ्या विविध योजनांतील व्याजदरात कपात केली. त्यामुळे नाराज झालेल्या अनेक लोकांनी म्युच्युअल फंडाला पसंती दिल्याचे दिसते. बाजारात पडझड झाल्याने काही शेअर्सही स्वस्तात मिळत आहेत.
म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक उच्चांकावर
मे महिन्यामुळे भारतीय शेअर बाजारात जरी मोठे चढउतार अनुभवण्यास मिळत असले, तरी गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडाकडे ओढा झपाट्याने वाढत असून, एप्रिल २०१६च्या
By admin | Published: May 27, 2016 02:06 AM2016-05-27T02:06:57+5:302016-05-27T02:06:57+5:30