Rekha Jhunjhunwala Stocks : गेल्या काही महिन्यांत शेअर बाजारात अनेक स्टॉक्सनं बंपर परतावा मिळाला आहे. या काळात स्टार गुंतवणूकदार आणि रिटेल इनव्हेस्टर्सच्या पोर्टफोलिओमध्ये चांगली वाढ झाली आहे. प्रसिद्ध गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala) यांच्या पोर्टफोलिओतील काही शेअर्स २०२४ मध्ये खूप चांगला परतावा देत आहेत. काही शेअर्स या कॅलेंडर वर्षात ८९ टक्क्यांपर्यंत परतावा देत आहेत.
दिग्गज गुंतवणूकदार आणि बिग बुल म्हणून ओळखले जाणारे दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी आणि स्टार गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांनी भारतीय शेअर बाजारात मोठी गुंतवणूक केली आहे. मार्च २०२४ पर्यंत त्यांच्याकडे बँकिंग, ऑटो, फायनान्शिअल सर्व्हिसेसपासून गेमिंगपर्यंत विविध क्षेत्रातील सुमारे ३१ शेअर्स आहेत.
ट्रेंडलाइननुसार, रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये टायटन, मेट्रो ब्रँड्स, एनसीसी, इंडियन हॉटेल्स अँड कंपनी आणि फोर्टिस हेल्थकेअर यांचा समावेश आहे. पाहूया रेखा झुनझुनवाला यांचे २०२४ मधील टॉप ५ स्टॉक होल्डिंग्स आणि २०२४ मधील त्यांची कामगिरी पाहूया.
कोणते आहेत शेअर्स?
झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सर्वात मोठी गुंतवणूक टायटन कंपनीची आहे. हा टाटा समूहाचा हिस्सा आहे. त्यांच्याकडे टायटनचे ४.७ कोटी शेअर्स आहेत. त्यांची एकूण गुंतवणूक १७,९६५ कोटी रुपये आहे. त्यांची दुसरी सर्वात मोठी गुंतवणूक मेट्रो ब्रँड्समध्ये आहेत. याचे त्यांच्याकडे २.६ कोटी शेअर्स आहेत. त्यांची यात ३२५३ कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. त्यांची तिसरी मोठी गुंतवणूक एनसीसी लिमिटेडमध्ये (नागार्जून कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड) आहे. त्यांच्याकडे या कंपनीचे ७.८ कोटी शेअर्स असून यात त्यांची २४६७ कोटी रुपयांची गुंतवणूक आहे.
त्यांची चौथी मोठी गुंतवणूक टाटा कंपनीच्या इंडियन हॉटेल्समध्ये आहे. या कंपनीचे त्यांच्याकडे २.९ कोटी शेअर्स आहेत. त्यांची या कंपनी २०७३ कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. त्यांची पाचवी मोठी गुंतवणूक हॉस्पीटल चेन फोर्टिस हेल्थकेअरमध्ये आहे. हे त्यांच्या टॉप ५ होल्डिंगपैकी एक आहे. कंपनीमध्ये त्यांचे १९२४ कोटी रुपयांचे ३.१ कोटी रुपयांचे शेअर्स आहेत.
(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)