Lokmat Money > बिझनेस न्यूज > Adani Power च्या शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, ₹५७० वर गेला भाव; कंपनीचा नफाही वाढला

Adani Power च्या शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, ₹५७० वर गेला भाव; कंपनीचा नफाही वाढला

कंपनीचा निव्वळ नफा ९ कोटी रुपयांवरून २,७३८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 02:44 PM2024-01-29T14:44:05+5:302024-01-29T14:45:07+5:30

कंपनीचा निव्वळ नफा ९ कोटी रुपयांवरून २,७३८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

investors bullish on Adani Power shares price rises to rs 570 The company s profit also increased huge profit to investors | Adani Power च्या शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, ₹५७० वर गेला भाव; कंपनीचा नफाही वाढला

Adani Power च्या शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, ₹५७० वर गेला भाव; कंपनीचा नफाही वाढला

Adani Power Share: भारतातील सर्वात मोठी खासगी थर्मल पॉवर उत्पादक अदानी पॉवरचे शेअर्स सोमवारी सुरुवातीच्या कामकाजादम्यान 5 टक्क्यांच्या वाढीसह  ₹570 वर पोहोचले. कंपनीच्या शेअर्समधील या वाढीचं कारण म्हणजे उत्कृष्ट तिमाही निकाल. कंपनीनं गुरुवारीच डिसेंबर तिमाहीचे मजबूत निकाल जाहीर केले. 

डिसेंबर तिमाहीत अदानी पॉवरचा नफा अनेक पटींनी वाढला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर, 2023) अदानी पॉवरचा निव्वळ नफा 2,738 कोटी रुपये झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 9 कोटी रुपये होता.

डिसेंबर तिमाहीचा निकाल

कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन तिमाहीत (एप्रिल-डिसेंबर, 2023) निव्वळ नफा 230 टक्क्यांनी वाढून 18,092 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीतील कंपनीला 5,484 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. अदानी पॉवरनं गुरुवारी एका निवेदनात सांगितले की, समीक्षाधीन तिमाहीत त्यांचं एकूण उत्पन्न वाढून 13,355 कोटी रुपये झालं आहे, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 8,290 कोटी रुपये होतं.

कंपनीबाबत माहिती

अदानी पॉवर ही अदानी समूहाची भारतातील थर्मल पॉवर उत्पादन करणारी खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनीनं गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि झारखंडमध्ये 15,210 मेगावॅटची थर्मल पॉवर क्षमता स्थापित केली आहे. कंपनीनं गुजरातमध्ये 40 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्पही उभारला आहे. अदानी पॉवरचं मार्केट कॅप 2,17,859.20 कोटी रुपये झालं आहे. कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 589.30 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 132.55 रुपये आहे. हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर कंपनीच्या शेअरनं नीचांकी स्तराला स्पर्श केला होता.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: investors bullish on Adani Power shares price rises to rs 570 The company s profit also increased huge profit to investors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.