Lokmat Money > बिझनेस न्यूज > इस्रायल हमासच्या झटक्यातून शेअर बाजार बाहेर, गुंतवणूकदारांनी कमावले ३.५८ लाख कोटी

इस्रायल हमासच्या झटक्यातून शेअर बाजार बाहेर, गुंतवणूकदारांनी कमावले ३.५८ लाख कोटी

मंगळवारी भारतीय शेअर बाजार इस्रायल हमासच्या धक्क्यातून सावरताना दिसला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 04:40 PM2023-10-10T16:40:41+5:302023-10-10T16:40:55+5:30

मंगळवारी भारतीय शेअर बाजार इस्रायल हमासच्या धक्क्यातून सावरताना दिसला.

Investors earn Rs 3 58 lakh crore in stock market exit from Israel Hamas strike huge return great come back | इस्रायल हमासच्या झटक्यातून शेअर बाजार बाहेर, गुंतवणूकदारांनी कमावले ३.५८ लाख कोटी

इस्रायल हमासच्या झटक्यातून शेअर बाजार बाहेर, गुंतवणूकदारांनी कमावले ३.५८ लाख कोटी

Share Market Update: मंगळवारी भारतीय शेअर बाजार इस्रायल हमासच्या धक्क्यातून सावरताना दिसला. कामकाजाच्या अखेरीस शेअर बाजार मोठ्या वाढीसह बंद झाला. जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणानेही आजच्या वाढीला आधार दिला. सेन्सेक्स पुन्हा 66,000 अंकांच्या पुढे बंद झाला. तर निफ्टीही 19,700 च्या जवळपास पोहोचला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही 1 टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले. बीएसईचे सर्व क्षेत्रीय निर्देशांकही वाढीसह बंद झाले. रिअल्टी निर्देशांक 4 टक्क्यांपेक्षा अधिक वाढला. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज सुमारे 3.58 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

व्यवहाराच्या अखेरिस बीएसई सेन्सेक्स 566.97 अंकांनी किंवा 0.87 टक्क्यांनी वाढून 66,079.36 वर बंद झाला. तर एनएसईचा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 177.50 अंक किंवा 0.91 टक्क्यांच्या वाढीसह 19,689.85 वर बंद झाला.

गुंतवणूकदारांना नफा
बीएसई वरील लिस्टेड कंपन्यांचं एकूण बाजार भांडवल मंगळवारी वाढून 319.76 लाख कोटी रुपये झालं, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे सोमवारी 9 ऑक्टोबर रोजी 316.18 लाख कोटी रुपये होतं. अशा प्रकारे, बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप आज सुमारे 3.58 लाख कोटी रुपयांनी वाढलं. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 3.58 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

हे शेअर्स वधारले
सेन्सेक्समधील 30 पैकी 27 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 2.90 टक्क्यांनी वाढ झाली. तर कोटक महिंद्रा बँक, टाटा मोटर्स, JSW स्टील आणि महिंद्रा अँड महिंद्राचे (M&M) चे शेअर्स 1.63 टक्के ते 2.15 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.

यामध्ये घसरण
सेन्सेक्समधील उर्वरित 3 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यापैकी इंडसइंड बँकेचे शेअर्स 0.54 टक्क्यांनी घसरले. याशिवाय टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि टायटनच्या शेअर्समध्ये अनुक्रमे 0.22 टक्के आणि 0.02 टक्क्यांची घसरण झाली.

Web Title: Investors earn Rs 3 58 lakh crore in stock market exit from Israel Hamas strike huge return great come back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.