मुक्का प्रोटीन्सच्या आयपीओला (Mukka Proteins IPO) पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आयपीओला पहिल्याच दिवशी 2.67 पट सबस्क्रिप्शन मिळालं. गुरुवारी, आयपीओ किरकोळ श्रेणीत 4.07 पट, क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्सच्या कॅटेगरीत 1.01 पट आणि नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सच्या कॅटेगरीत 1.60 पट सबस्क्राईब झाला. दरम्यान, कंपनी ग्रे मार्केटमध्ये चमकदार कामगिरी करत आहे.
26 ते 28 रुपयांचा प्राईज बँड
मुक्का प्रोटीन्स आयपीओची किंमत 26 ते 28 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. कंपनीने 535 शेअर्सचा एक लॉट तयार केला आहे. यामुळे गुंतवणूकदारांना किमान 14,980 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. त्याच वेळी, किरकोळ गुंतवणूकदाराला जास्तीत जास्त 6955 शेअर्ससाठी बोली लावता येईल.
ग्रे मार्केटमध्ये चमकदार कामगिरी (Mukka Proteins GMP Today)
इन्व्हेस्टर गेनच्या रिपोर्टनुसार ग्रे मार्केटमध्ये कंपनीची कामगिरी उत्कृष्ट आहे. कंपनी आज ग्रे मार्केटमध्ये 28 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेडिंग करत आहे. म्हणजेच पहिल्या दिवशी गुंतवणूकदारांना 28 रुपयांचा नफा झाला. असं झाल्यास पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना 100 टक्के नफा मिळण्याची शक्यता आहे.
मुक्का प्रोटीन्सच्या आयपीओची साईज 224 कोटी रुपये आहे. कंपनी आयपीओद्वारे 8 कोटी फ्रेश शेअर्स जारी करणार आहे. 5 मार्च 2024 रोजी गुंतवणूकदारांना शेअर्स अलॉट करण्यात येणार आहे. त्याच वेळी, 7 मार्च 2024 रोजी शेअर बाजारात कंपनीचं लिस्टिंग होण्याची शक्यता आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)