प्रसाद गो. जोशीलोकमत न्यूज नेटवर्क२०२१ हे वर्ष भांडवल बाजारासाठी अतिशय चांगले ठरले आहे. या वर्षामध्ये गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये ७८ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे. त्याचप्रमाणे सेन्सेक्स आणि निफ्टीने अनेक विक्रमांची नोंदही केली आहे. या वर्षभरामध्ये बाजारात नोंदणीकृत असलेल्या कंपन्यांच्या बाजार भांडवलमूल्यामध्ये ७७,९६,६९२.९५ लाख कोटी रुपयांची घसघशीत वाढ पहायला मिळाली आहे. वर्षाच्या अखेरीस ते २,६६,००,२११.५५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तत्पूर्वी भांडवलमूल्याने १८ ऑक्टोबर रोजी २,७४, ६९,६०६.९३ कोटी रुपये अशी आतापर्यंतची सर्वोच्च पातळी गाठली होती. यामुळे हे वर्ष गुंतवणूकदारांसाठी संस्मरणीय ठरणारे आहे.
सेन्सेक्समध्ये २२ तर निफ्टीत २४ टक्के वाढ शेअर बाजारामध्ये नुकतेच संपलेले वर्ष एक वैशिष्ट्यपूर्ण व संस्मरणीय वर्ष ठरले आहे. या वर्षामध्ये बाजाराचा संवेदनशील निर्देशांक (सेन्सेक्स) १०,५०२.४९ अंशांनी वाढला. याचाच अर्थ या निर्देशांकाने २१.९९ टक्क्यांची वाढ नोंदविली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) २४.११ टक्के म्हणजेच ३३७२.३० अंशांनी झेपावला आहे. या वर्षभरामध्ये सेन्सेक्सने ५० हजारांपासून ६२,२४५ अंशांपर्यंतची सर्वोच्च पातळी गाठली तर निफ्टीनेही १८,६०४ अंशांच्या नवीन उच्चांकाची नोंद केली आहे.
अशी असेल वाटचालn अर्थव्यवस्थेशी संबंधित विविध आकडेवारी आणि ओमायक्रॉनची परिस्थिती यावरच या सप्ताहातील बाजाराची वाटचाल ठरणार आहे. n वाहन आणि घरांची विक्री, पीएमआय अशी महत्त्वाची आकडेवारी येणे बाकी आहे. त्याचप्रमाणे ओमायक्रॉनचा प्रसार किती मोठ्या प्रमाणात होऊ शकेल, ते बघूनच बाजारात व्यवहार होऊ शकतात.