Oswal Greentech share price: गुरुवारी शेअर बाजारात विक्रीचं वातावरण असलं तरी ओसवाल ग्रीनटेकच्या शेअर्सवर मात्र गुंतवणूकदारांनी उड्या घेतल्या होत्या. हा पेनी शेअर गुरुवारी 37.74 रुपयांवर बंद झाला. मागील 31.45 रुपयांच्या क्लोजिंगच्या तुलनेत स्टॉकनं 20 टक्क्यांच्या अपर सर्किटला हिट केलं. हा देखील शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर आहे. ट्रेडिंग आणि रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित असलेल्या ओसवाल ग्रीनटेकचा हा शेअर 20 मार्च 2023 रोजी 16.96 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता.शेअर होल्डिंग पॅटर्नडिसेंबर 2023 पर्यंत, प्रवर्तकांकडे ओसवाल ग्रीनटेकमध्ये 64.34 टक्के हिस्सा होता. तर, पब्लिक शेअरहोल्डिंग 35.66 टक्के होती. अरुण ओसवाल यांच्याकडे प्रवर्तकांमध्ये सर्वाधिक ५,१५,४४,६१८ शेअर्स आहेत. हे प्रमाण 20.07 टक्के इतके आहे. तर ओसवाल ॲग्रो मिल्स लिमिटेडचे 11,36,47,217 शेअर्स होते. हे प्रवर्तक समूहाच्या 44.25 टक्के भागिदारीइतके आहे.किती मिळाले रिटर्नया शेअरनं एका आठवड्यात बीएसई सेन्सेक्सच्या तुलनेत 25.26 टक्के परतावा दिला आहे. या वर्षी आतापर्यंत या शेअरच्या किंमतीत 40.72 टक्के वाढ झाली आहे. एका महिन्याच्या कालावधीसाठी परतावा सुमारे 50 टक्के आहे.शुक्रवारी शेअर बाजार होता बंदप्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवारी शेअर बाजार, परकीय चलन बाजार आणि सराफासह सर्व कमोडिटी मार्केट बंद होते. गुरुवारी 30 शेअर्सवर आधारित सेन्सेक्स 359.64 अंकांच्या किंवा 0.51 टक्क्यांच्या घसरणीसह 70,700.67 अंकांवर बंद झाला. कामकाजादरम्यान तो 741.27 अंकांनी घसरला होता. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा पन्नास शेअर्सवर आधारित निफ्टीही 101.35 अंकांच्या किंवा 0.47 टक्क्यांच्या घसरणीसह 21,352.60 अंकांवर बंद झाला होता.(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंव तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
₹३१ च्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, २० टक्क्यांचं अपर सर्किट; रॉकेट स्पीडनं वाढतोय भाव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 10:19 AM