Lokmat Money > बिझनेस न्यूज > ₹६७ च्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ८ टक्क्यांची तेजी, एक घोषणा आणि स्टॉक सुस्साट

₹६७ च्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ८ टक्क्यांची तेजी, एक घोषणा आणि स्टॉक सुस्साट

SpiceJet Share: कंपनीचा शेअर ८.२ टक्क्यांनी वधारून ६७.९८ रुपयांच्या इंट्राडे उच्चांकी पातळीवर पोहोचला. शेअर्सच्या या वाढीमागे एक मोठं कारण आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 02:56 PM2024-10-09T14:56:06+5:302024-10-09T14:56:06+5:30

SpiceJet Share: कंपनीचा शेअर ८.२ टक्क्यांनी वधारून ६७.९८ रुपयांच्या इंट्राडे उच्चांकी पातळीवर पोहोचला. शेअर्सच्या या वाढीमागे एक मोठं कारण आहे.

Investors jump on share SpiceJet airlines rs 67 An 8 percent gain intraday an announcement and stocks booming | ₹६७ च्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ८ टक्क्यांची तेजी, एक घोषणा आणि स्टॉक सुस्साट

₹६७ च्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ८ टक्क्यांची तेजी, एक घोषणा आणि स्टॉक सुस्साट

SpiceJet Share: विमान कंपनी स्पाइसजेटच्या शेअरमध्ये बुधवारी जोरदार तेजी दिसून आली. कंपनीचा शेअर ८.२ टक्क्यांनी वधारून ६७.९८ रुपयांच्या इंट्राडे उच्चांकी पातळीवर पोहोचला. शेअर्सच्या या वाढीमागे एक मोठं कारण आहे. स्पाइसजेटनं विमान भाडेतत्त्वार देणारी कंपनी बॅबकॉक अँड ब्राऊन एअरक्राफ्ट मॅनेजमेंट (बीबीएएम) सोबतचा १३.२ कोटी डॉलरचा वाद सामंजस्यानं सोडविण्याची घोषणा केली आहे.

काय आहे डिटेल?

'होरायझन एव्हिएशन १ लिमिटेड, होरायझन II एव्हिएशन ३ लिमिटेड आणि होरायझन III एव्हिएशन २ लिमिटेड यांच्याशी १३.१८ कोटी डॉलर (१,१०७ कोटी रुपये) संबंधित वाद २.२५ कोटी डॉलरमध्ये मिटला आहे,' असं स्पाइसजेटनं एका निवेदनात म्हटलंय. स्पाइसजेटला गेल्या महिन्यात क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंटच्या (क्यूआयपी) माध्यमातून ३,००० कोटी रुपयांचे नवे भांडवल मिळाल्यानंतर हा करार करण्यात आला आहे. यामुळे स्पाइसजेटला ताळेबंद मजबूत करण्यास आणि एकूण दायित्वं कमी करण्यास मदत झाली आहे.

ताफ्यातील विमानांची संख्या वाढणार

पुढील महिन्यापर्यंत आपल्या ताफ्यात १० विमाने समाविष्ट केली जातील. १० ऑक्टोबर रोजी पहिले विमान ताफ्यात दाखल होणार आहे. यापैकी सात विमानं भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत, तर बंद पडलेली तीन विमाने पुन्हा सुरू करण्यात येत आहेत, अशी माहिती स्पाइसजेटने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. लाइव्ह एअरक्राफ्ट फ्लीट ट्रॅकिंग वेबसाइट planespotter.net नुसार, एअरलाइन्सकडे केवळ १९ विमानं कार्यरत आहेत, तर ८ ऑक्टोबरपर्यंत ३६ विमानं ग्राऊंड करण्यात आली आहेत.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Investors jump on share SpiceJet airlines rs 67 An 8 percent gain intraday an announcement and stocks booming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.