Lokmat Money > बिझनेस न्यूज > विक्रीमुळे गुंतवणूकदारांनी गमावले १.८० लाख कोटी; नफा कमवण्याची मोठी संधी

विक्रीमुळे गुंतवणूकदारांनी गमावले १.८० लाख कोटी; नफा कमवण्याची मोठी संधी

परकीय वित्त संस्थांनी बाजारामध्ये ६०९२.५६ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 07:11 AM2021-10-04T07:11:59+5:302021-10-04T07:12:29+5:30

परकीय वित्त संस्थांनी बाजारामध्ये ६०९२.५६ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली.

Investors lose Rs 1.80 lakh crore due to sales; Great opportunity to make a profit | विक्रीमुळे गुंतवणूकदारांनी गमावले १.८० लाख कोटी; नफा कमवण्याची मोठी संधी

विक्रीमुळे गुंतवणूकदारांनी गमावले १.८० लाख कोटी; नफा कमवण्याची मोठी संधी

प्रसाद गो. जोशी

मुंबई : वाढलेल्या शेअर बाजारात नफा कमविण्याची संधी असल्यामुळे गुंतवणूकदार आणि परकीय वित्त संस्थांनी मोठ्या प्रमाणावर विक्री केल्यामुळे बाजारात मोठी घसरण झालेली दिसून आली. यामुळे गुंतवणूकदारांचे १.८० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. मात्र स्मॉलकॅपमध्ये वाढ झालेली दिसून आली. गत सप्ताहामध्ये बाजारात झालेल्या घसरणीमुळे बाजाराचे भांडवल मूल्य १,८०,५३४ कोटी रुपयांनी कमी  झाले. शेअर बाजारातील पहिल्या दहा कंपन्यांपैकी रिलायन्स आणि एनटीपीसी या केवळ दोन कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये वाढ झाली.

परकीय वित्त संस्थांकडून मोठी विक्री 
परकीय वित्त संस्थांनी बाजारामध्ये ६०९२.५६ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. मात्र देशांतर्गत वित्त संस्था बाजार खाली आल्याने विक्रीसाठी पुढे आल्या आणि त्यांनी ४३०५.४ कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली. सप्टेंबर महिन्यात परकीय वित्त संस्थांनी ९१३.७७ कोटी तर, देशी वित्त संस्थांनी ५९४८.८५ कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केलेली दिसून आली.

मिड कॅप कंपनी म्हणजे काय?
ज्या कंपन्यांचे मार्केट कॅपिटल किंवा बाजार भांडवल मूल्य हे २ ते १० अब्ज डॉलर एवढे असते,त्यांना मिड कॅप कंपनी असे म्हटले जाते. 

आगामी सप्ताहामध्ये होत असलेल्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीवर बाजाराची नजर आहे. गत सप्ताहात जाहीर झालेला पीएमआय  तसेच आगामी सप्ताहात जाहीर होणारी अन्य आकडेवारी याचाही परिणाम बाजारावर होईल.

Web Title: Investors lose Rs 1.80 lakh crore due to sales; Great opportunity to make a profit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.