Join us  

गुंतवणूकदार कंगाल, 31 लाख कोटी बुडाले; शेअर बाजारात चार वर्षांतील सर्वांत मोठी घसरण 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2024 9:16 AM

मंगळवारच्या दिवसभरामध्ये गुंतवणूकदारांचे सुमारे ३१ लाख कोटी रुपये बुडाले.

मुंबई : पुन्हा एकदा पूर्ण बहुमतातील मोदी सरकार अधिकारावर येणार असल्याचे एक्झिट पोलने सूचित करताच गुंतवणूकदारांमध्ये उत्साह संचारला आणि सोमवारी शेअर बाजार तुफानी उसळला; मात्र मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे आकडे जाहीर होऊ लागले आणि गुंतवणूकदारांमध्ये निराशेचे वातावरण पसरले. यामुळे सेन्सेक्स सुमारे चार हजार अंशांनी खाली येऊनच खुला झाला आणि बाजारावर प्रचंड विक्रीचे दडपण येत बाजार खाली जाऊ लागला. मंगळवारच्या दिवसभरामध्ये गुंतवणूकदारांचे सुमारे ३१ लाख कोटी रुपये बुडाले.

मंगळवारी सकाळपासूनच बाजारावर अस्वलाने आपली घट्ट पकड बसविली होती. अस्वलाच्या या मिठीतूून बाजार दिवसभर बाहेर आला नाही. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ७६,२८५.७८ अंशांवर खुला झाला. त्यानंतर त्यामध्ये आणखी घट होऊन तो ७०,२३४.४३ अंशांपर्यंत खाली गेला होता. मात्र त्यानंतर त्यामध्ये काहीशी सुधारणा होऊन दिवसअखेर तो ७२,०७९.०५ अंशांवर बंद झाला. दिवसअखेर त्यामध्ये ४३८९.८३ अंशांची घट झाली. याचाच अर्थ तो दिवसभरात सेन्सेक्स ५.७४ टक्क्यांनी घटला आहे.

पाचपैकी तीन वेळा वाढला निर्देशांक

लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर गेल्या पाच निवडणुकांमध्ये तीन वेळा निर्देशांकाने वाढ दिली आहे.-    २३ मे २०१९ ३८८११.३९ (-) २९८.८२-    १६ मे, २०१४ २४,१२१.७४ (+) २१६.१४-    १६ मे, २००९ १४,२८४.२१ (+)२११०.७९(व्यवहार १८ मे रोजी झाले.)-    १३ मे, २००४ ५,३९९.४७ (+) ४१.१२-    ६ ऑक्टोबर, १९९९ ४६९७.७० (-) ११.२२

'ही' आहेत प्रमुख कारणेबाजार खाली येण्याला पूर्ण बहुमत कोणालाही न मिळणे हे प्रमुख कारण आहे. जर एकाच पक्षाचे सरकार नसेल तर धोरणांची आखणी आणि त्यांची अंमलबजावणी यात कमालीचे अडथळा निर्माण होतात. परिणामी देशातील आर्थिक अस्थिरता वाढू लागते. एका पक्षाला बहुमत नसल्याने चिंता वाढू लागली आहे. भाजपकडून अधिक गतीने सुधारणा राबविल्या जात होत्या. त्यामुळे शेअर बाजारालाही अधिक वेगाने वाढण्यासाठी संधी मिळाली . त्यामुळे हा पक्ष बहुमतापासून दूर राहिल्याने बाजाराला काळजी वाटू लागली. आणि बाजार खाली आला.

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४ निकालनिर्देशांक