Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुंतवणूकदारांची पसंती इक्विटी योजनांना

गुंतवणूकदारांची पसंती इक्विटी योजनांना

गेल्या महिन्यात शेअर बाजारात झालेल्या पडझडीच्या पार्श्वभूमीवर म्युच्युअल फंड योजनांनी खरेदीचा सपाटा लावला असून, प्रामुख्याने खरेदीचा कल हा इक्विटी योजनांत असल्याचे दिसून आले आहे

By admin | Published: May 10, 2016 03:32 AM2016-05-10T03:32:39+5:302016-05-10T03:32:39+5:30

गेल्या महिन्यात शेअर बाजारात झालेल्या पडझडीच्या पार्श्वभूमीवर म्युच्युअल फंड योजनांनी खरेदीचा सपाटा लावला असून, प्रामुख्याने खरेदीचा कल हा इक्विटी योजनांत असल्याचे दिसून आले आहे

Investor's Preference Equity Schemes | गुंतवणूकदारांची पसंती इक्विटी योजनांना

गुंतवणूकदारांची पसंती इक्विटी योजनांना

मुंबई : गेल्या महिन्यात शेअर बाजारात झालेल्या पडझडीच्या पार्श्वभूमीवर म्युच्युअल फंड योजनांनी खरेदीचा सपाटा लावला असून, प्रामुख्याने खरेदीचा कल हा इक्विटी योजनांत असल्याचे दिसून आले आहे. गुंतवणूकदारांचाही कल तपासला तर अधिकाधिक गुंतवणूकदार हे इक्विटी योजनांनाच पसंती देत असल्याचे दिसून आले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, एप्रिल महिन्यात म्युच्युअल फंडांच्या इक्विटी योजनांत सुमारे ४४३८ कोटी रुपयांची नवी गुंतवणूक झाली आहे. गेल्या पाच महिन्यांतील ही उच्चांकी गुंतवणूक ठरली आहे. डिसेंबर (२०१५) महिन्यात म्युच्युअल फंड कंपन्यांच्या इक्विटी योजनांत ३६४४ कोटी, जानेवारी (२०१६)मध्ये २९१४ कोटी रुपये, फेब्रुवारी (२०१६)मध्ये २५२२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. या तुलनेत डेट, लिक्वीड अथवा बॅलेन्स प्रकारच्या योजनांत तितकी आकर्षक गुंतवणूक झालेली नाही. इक्विटी योजनांत झालेल्या नव्या गुंतवणुकीपैकी ६० टक्के गुंतवणूक ही एसआयपीच्या माध्यमातून झालेली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Investor's Preference Equity Schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.