Lokmat Money > बिझनेस न्यूज > Share Market विक्रमी पातळीवर पोहोचूनही गुंतवणूकदार नाराजच, Zerodha चे नितीन कामथ म्हणतात...

Share Market विक्रमी पातळीवर पोहोचूनही गुंतवणूकदार नाराजच, Zerodha चे नितीन कामथ म्हणतात...

शेअर बाजार विक्रमी उच्चांक गाठत असला तरी रिटेल अॅक्टिव्हिटीमध्ये तेजी दिसत नसल्याचं मत झिरोधाचे सीईओ नितीन कामथ यांनी व्यक्त केलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 10:57 AM2023-06-19T10:57:32+5:302023-06-19T11:04:36+5:30

शेअर बाजार विक्रमी उच्चांक गाठत असला तरी रिटेल अॅक्टिव्हिटीमध्ये तेजी दिसत नसल्याचं मत झिरोधाचे सीईओ नितीन कामथ यांनी व्यक्त केलं.

Investors still upset despite share market hitting record highs Zerodha s Nitin Kamath shares chart investors less trading | Share Market विक्रमी पातळीवर पोहोचूनही गुंतवणूकदार नाराजच, Zerodha चे नितीन कामथ म्हणतात...

Share Market विक्रमी पातळीवर पोहोचूनही गुंतवणूकदार नाराजच, Zerodha चे नितीन कामथ म्हणतात...

सध्या शेअर बाजारानं विक्रमी पातळी गाठली आहे. एकीकडे शेअर बाजार उच्चांकी पातळी गाठत असला तरी दुसरीकडे रिटेल गुंतवणूकदारांचा यातील रस कमी होताना दिसतोय. शेअर बाजार विक्रमी उच्चांक गाठत असला तरी रिटेल अॅक्टिव्हिटीमध्ये तेजी दिसत नसल्याचं मत ग्राहकांच्या संख्येनुसार देशातील सर्वात मोठी ब्रोकरेज फर्म झिरोधाचे सीईओ नितीन कामथ यांनी व्यक्त केलं. एकीकडे व्याजदर वाढलेले आहेत आणि दुसरीकडे शेअर बाजारातही असलेल्या या तेजीच्या काळात किरकोळ गुंतवणूकदारांच्या अॅक्टिव्हिटीमध्ये वाढ होण्याची शक्यता नसल्याचं ते म्हणाले.

या वर्षी शेअर बाजाराची सुरुवात धीमी झाली. पण शुक्रवारी निफ्टी आणि सेन्सेक्सनं आजवरचा विक्रमी उच्चांक गाठला. जागतिक शेअर बाजारातील तेजीचा भारतातील शेअर बाजारवरही परिणाम दिसून येत आहे. रिटेल अॅक्टिव्हिटी अद्यापही कमकुवत आहे आणि वाढलेल्या व्याजदरांमुळे नजीकच्या भविष्यात शेअर बाजारात रिटेल अॅक्टिव्हिटी वाढण्याची अपेक्षा नसल्याचे नितीन कामथ म्हणाले.

"शेअर बाजार आजवरच्या विक्रमी पातळीवर आहे. परंतु यात बुल रन सारखं काही दिसून येत नाही. याचं कारण म्हणजे रिटेल अॅक्टिव्हिटीमध्ये तेजी नाही. जर नॅशनल स्टॉक एक्सचेंज, गुगल आणि सोशल मीडियाच्या ट्रेंडबद्दल सांगायचं झालं तर ते शेअर्स ऑल टाईम हायच्या तुलनेत खालीच आहेत," असं कामथ यांनी स्पष्ट केलं.

ट्रेडिंग कमी
दरम्यान, नितीन कामथ यांनी एक चार्टही शेअर केला आहे. जून २०२२ नंतर शेअर बाजारातील रिटेल अॅक्टिव्हिटी कमकुवत असल्याचं सांगण्यात आलं आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या मते, अॅक्टिव्ह क्लायंट गेल्या १२ महिन्यांत फक्त एकदा किंवा दोनदाच ट्रेडिंग करत असल्याचं यात सांगण्यात आलंय.

शेअर बाजारातील स्वारस्य कमी
बँकांच्या निश्चित उत्पन्नाच्या साधनांमध्ये लोकांना चांगलं व्याज मिळत असल्यानं किरकोळ गुंतवणूकदारांचा शेअर बाजारातील रस कमी झाला आहे. बरेच लोक बाजारात सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय शोधण्यात व्यस्त आहेत आणि त्यामुळे शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या हालचाली कमी झाल्या असल्याचंही कामथ यांनी स्पष्ट केलं.

Web Title: Investors still upset despite share market hitting record highs Zerodha s Nitin Kamath shares chart investors less trading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.