Apple vs Samsung: iPhone 12 सीरिजचा स्मार्टफोन हा Apple या कंपनीसाठी लकी ठरला आहे. Gartner च्या अहवालानुसार Apple च्या नव्या सीरिजच्या स्मार्टफोनमुळे आयफोनची लोकप्रियता वाढल्याचं म्हटलं आहे. गार्टनरच्या अहवालानुसार आयफोन 12 सीरिजच्या वर्चस्वामुळे कंपनीनं सॅमसंगला शिपिंगमध्ये मागे टाकलं आहे. तसंच 2020 च्या अंतिम तिमाहीत Apple हा जगातीस टॉप स्मार्टफोन ब्रँड बनला आहे. Apple तब्बल 5 वर्षांनंतर Samsung ला मागे टाकलं आहे. यापूर्वी Apple नं 2016 मध्ये Samsung ला मागे टाकलं होतं.
अहवालानुसार डिसेंबर 2020 मध्ये Apple नं तब्बल 8 कोटी आयफोन शिप केले होते. हे सॅमसंगच्या तुलनेत अधिक होते. याव्यतिरिक्त Apple च्या विक्रीत 14.9 टक्क्यांची वाढ झाली तर सॅमसंगच्या विक्रीत 11.8 टक्क्यांची घट झाली. दरम्यान, Apple नं आयफोन 12 आणि आयफोन 11 च्या जोरावर मोठी झेप घेतली असल्याचं म्हटलं जात आहे.
Xiaomi ची विक्रीही वाढली
संपूर्ण वर्षाबाबत सांगायचं झालं तर स्मार्टफोनच्या विक्रीमध्ये सॅमसंगच आघाडीवर आहे. परंतु त्यांना शाओमी, विवो आणि ओप्पोसारख्या ब्रँडकडून तगडी टक्कर मिळत आहे. याव्यतिरिक्तही सॅमसंग 2020 मध्ये मार्केट लीडर होती. मार्केट लीडर असली तरी सॅमसंग या कंपनीच्या विक्रीत 14.6 टक्क्यांची घट झाली. तर वार्षिक आधारावर Apple च्या विक्रीत 3.3 टक्क्यांची वाढ झाली.
iPhone 12 नं केली कमाल, ५ वर्षांनंतर Samsung पेक्षा अधिक झाली Apple च्या स्मार्टफोन्सची विक्री
Apple vs Samsung: iPhone 12 ची झाली सर्वाधिक विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 12:09 PM2021-02-24T12:09:57+5:302021-02-24T12:11:39+5:30
Apple vs Samsung: iPhone 12 ची झाली सर्वाधिक विक्री
Highlightsयापूर्वी 2016 मध्ये Apple टाकलं होतं सॅमसंगला मागेXiaomi ची विक्रीही वाढली