ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म (Online Shopping Platform) फ्लिपकार्टवर (Flipkart) सुरू असलेला बिग बिलियन डे सेल (Big Billion Days Sale) नुकताच संपला. या सेलमध्ये ग्राहकांना आयफोन 13 (Apple iPhone 13) स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळाली होती. परंतु त्यात जर तुम्ही खरेदी करण्यापासून राहिला असाल तर आता पुन्हा एकदा तुम्हाला याची संधी मिळणार आहे.
फ्लिपकार्टने 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या बिग दसरा सेलची (Big Dussehra Sale) अधिकृत घोषणा केली आहे. या सेलमध्येही iPhone 13 सर्वात कमी किमतीत खरेदी करता येणार असल्याचे समोर आले आहे. म्हणजेच, हे प्रीमियम डिव्हाइस ग्राहकांना पुन्हा एकदा 50,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध होईल आणि त्यावर विशेष बँक ऑफर्सचा लाभही मिळेल.
फायद्याचं ठरणार?
iPhone 13 मध्ये 6.1-इंचाचा डिस्प्ले त्यापूर्वी लाँच झालेल्या iPhone 12 सारखाच आहे. या फोनमध्ये 12MP वाईड आणि अल्ट्रा-वाइड कॅमेरा लेन्स देण्यात आली आहे. बॅटरीबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये iPhone 12 पेक्षाही मोठी बॅटरी आहे. त्याच वेळी, या वर्षी लाँच झालेल्या iPhone 14 ला iPhone 13 च्या तुलनेत मोठे अपग्रेड दिले गेले नाहीत. अशा परिस्थितीत, सवलतीत iPhone 13 खरेदी करणे खूप चांगले ठरू शकते.
अन्य डिव्हाईसेसवर सूट
iPhone 13 व्यतिरिक्त, Flipkart सेलमध्ये iPhone 12, Samsung Galaxy S22 आणि Pixel 6a सारख्या इतर स्मार्टफोन्सवर मोठी सवलत आणि डील देखील मिळेल. दसरा सेलमध्ये खरेदीसाठी HDFC बँक कार्ड युझर्स 10 टक्के अतिरिक्त सूट मिळेल. Flipkart Pay Later सेवा वापरल्यानंतरही ग्राहकांना कॅशबॅक आणि इतर फायदे मिळतील.
याशिवाय सॅमसंग, वनप्लस, ओप्पो, शाओमी, व्हिवो, मोटोरोला, नोकिया आणि रिअलमी या सर्वच ब्रँड्सच्या स्मार्टफोनवर डिस्काऊंट मिळणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स कॅटेगरीवर तब्बल 80 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळेल. तर टीव्ही आणि अप्लायंसेसवर 75 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते.