Join us

खुषखबर! iPhone 13 पुन्हा स्वस्त झाला, येथे Amazon-Flipkart पेक्षाही मिळेल मोठी सूट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 12:59 PM

दिपावली निमित्त ई-कॉमर्स साईटनी ग्राहकांसाठी मोठी सूट दिली होती. यात आयफोनपासून लॅपटॉपर्यंत अनेक वस्तुंवर मोठी सूट मिळत होती.

दिपावली निमित्त ई-कॉमर्स साईटनी ग्राहकांसाठी मोठी सूट दिली होती. यात आयफोनपासून लॅपटॉपर्यंत अनेक वस्तु अर्ध्या किमतीत मिळत होत्या. आता Apple iPhone 13 अतिशय कमी किमतीत मिळू शकतो. Amazon आणि Flipkart सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने फोन डिस्काउंट, एक्सचेंज आणि बँकिंग ऑफर जाहीर केल्या आहेत. ऍपल स्टोअरमध्ये काही आकर्षक ऑफर्ससह iPhone देखील उपलब्ध आहे.

आयफोन 13 सध्या बेस व्हेरिएंट 128GB स्टोरेज व्हेरिएंट सध्या Amazon वर ६६,९०० रुपये, Flipkart वर ६६,९९० रुपये आणि Apple Store वर ६९,९९० रुपयांना उपलब्ध आहे. 

कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! जगाच्या तुलनेत भारतात वाढणार पगार, वाचा सविस्तर

iPhone 13 चे 128GB मॉडेल Amazon वर जवळपास सर्व रंग पर्यायांमध्ये ६६,९०० च्या सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. फोनवर एमआरपीवर ३,००० रुपये वाचवू शकता. याशिवाय फोनवर १४,०५० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर आहे, फोनची किंमत ५२,८५० रुपयांपर्यंत खाली आली आहे. फोनवर एकूण ४ बॅक ऑफर उपलब्ध आहेत, याचा फायदा घेऊन तुम्ही फोनची किंमत १,००० रुपयांपर्यंत कमी करू शकता. एक्सचेंज आणि बँक ऑफरनंतर, फोन ५१,८५० रुपयांमध्ये खरेदी करु शकता.

iPhone 13 128GB स्टोरेज व्हेरिएंट Flipkart वर ४ टक्के सवलतीसह ६६,९९० रुपयांना उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट तुमच्या  फोनवर १८,५०० रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस देत आहे, फोनची किंमत ४८,४९० रुपयांपर्यंत खाली आहे. यात एक्सचेंज बोनसची रक्कम जुन्या फोनची स्थिती आणि मॉडेलवर अवलंबून असेल. फ्लिपकार्ट फोनवर अनेक बँक ऑफर देखील देत आहे, ज्याचा फायदा घेऊन तुम्ही फोनची किंमत २,००० रुपयांपर्यंत कमी करू शकता. म्हणजेच, तुम्ही Flipkart वरून ४६,४९० रुपयांमध्ये iPhone 13 खरेदी करू शकता. 

तुम्हाला Apple Store मधून iPhone 13 विकत घ्यायचा असेल, तर हा फोन येथे ६९,९०० रुयांमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही ट्रेड-इन पर्यायाची निवड करत असताना, तुम्हाला २२०० ते ५८,७३० रुपयांमध्ये मिळू शकतो.

यात आयफोन 13 Amazon आणि Flipkart या दोन्हींवर जवळपास समान किंमतमध्ये उपलब्ध आहे. तर Apple Store फोनवर सूट देत नाही. फ्लिपकार्ट फोनवर Amazon पेक्षा जास्त एक्सचेंज बोनस ऑफर करते. तुम्ही Apple Store मधून फोन खरेदी केल्यास ट्रेड-इन पर्याय तुम्हाला फोनवर २२०० ते ५८,७३० रुपयांची सूट देऊ शकतो.

टॅग्स :अॅपलफ्लिपकार्टअ‍ॅमेझॉन