iPhone China: आयफोनची मेकर कंपनी अॅपललाचीनच्या एका निर्णयामुळे मोठा झटका बसला आहे. चीनमध्ये सरकारी अधिकाऱ्यांना आयफोन वावरण्यास बंदी घातल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे बुधवारी अॅपलचे शेअर्स सुमारे 4 टक्क्यांनी घसरले, त्यानंतर गुरुवारी त्यात पुन्हा 3 टक्क्यांची घसरण झाली. दोन दिवसांच्या घसरणीमुळे अॅपलचे मार्केट कॅप अवघ्या दोन दिवसांत सुमारे $20 हजार कोटींनी (रु. 16.61 लाख कोटी) कमी झाले आहे.
चिनी सरकारी अधिकार्यांवरील आयफोन बंदी अशावेळी आली आहे, जेव्हा चीनी किरकोळ विक्रेत्यांनी Huawei कडून नवीन Mate 60 Pro फोनसाठी ऑर्डर घेणे सुरू केले. चीनच्या निर्णयामुळे अॅपलला मोठा झटका बसला आहे. कंपनीचे शेअर्स गुरुवारी, 7 सप्टेंबर रोजी Nasdaq वर $177.56 वर बंद झाले, तर 5 सप्टेंबर रोजी शेअर $189.7 वर होते. सध्या कंपनीचे मार्केट कॅप $2.78 लाख कोटी आहे.
चीनमध्ये आयफोनवर बंदी ?
वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, याची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही, पण अधिकाऱ्यांना कार्यालयात आयफोन आणू नयेत किंवा कार्यालयीन कामासाठी वापरू नयेत, असे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्या सरकारी कार्यालयांनी ही बंदी घातली आहे, हे अद्याप कळले नसले तरी ब्लूमबर्गच्या अहवालानुसार त्याची व्याप्ती वाढू शकते.
आयफोन बंदीमुळे अॅपलला धक्का ?
चीन, हाँगकाँग आणि तैवान अॅपलसाठी खूप महत्त्वाचे आहेत, कारण हे जगातील तिसरे मोठे मार्केट आहे. कंपनीच्या $39.4 बिलियन कमाईपैकी सुमारे 18 टक्के येथूनच येते. याशिवाय अॅपलची बहुतांश उत्पादने येथे असेंबल केली जातात. आता चीनमधील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना आयफोन ठेवण्यापासून रोखले तर त्याची विक्री जवळपास 5 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे.