Lokmat Money > बिझनेस न्यूज > iPhone सोबत चार्जर दिला नाही, ॲपलला लागला १६४ कोटींचा 'करंट'

iPhone सोबत चार्जर दिला नाही, ॲपलला लागला १६४ कोटींचा 'करंट'

मोबाइलसोबत चार्जर न देण्याचा एक नवा ट्रेंड मोबाइल हँडसेट बनवणाऱ्या कंपन्यांनी सुरू केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 03:27 PM2022-10-14T15:27:13+5:302022-10-14T15:27:58+5:30

मोबाइलसोबत चार्जर न देण्याचा एक नवा ट्रेंड मोबाइल हँडसेट बनवणाऱ्या कंपन्यांनी सुरू केला आहे.

iphone charger not given by apple fined 20 million dollar somewhere 164 crore indian rupees in brazil | iPhone सोबत चार्जर दिला नाही, ॲपलला लागला १६४ कोटींचा 'करंट'

iPhone सोबत चार्जर दिला नाही, ॲपलला लागला १६४ कोटींचा 'करंट'

Apple iPhone Charger: मोबाइल हँडसेट बनवणाऱ्या कंपन्यांनी बाजारात एक नवीन ट्रेंड सुरू केला आहे आणि तो म्हणजे मोबाईल फोनसोबत चार्जर न देण्याचा. सर्वप्रथम, ॲपलने स्मार्टफोनसह चार्जर न देण्यास सुरुवात केली आणि नंतर लगेचच सॅमसंगसह इतर कंपन्यांनी देखील त्यांच्या काही मॉडेलसह चार्जर देणे बंद केले. आयफोनसोबत चार्जर न देण्याचा अॅपलचा निर्णय कंपनीवरच भारी पडला आहे. ब्राझीलमध्ये कंपनीला चार्जरशिवाय आयफोन विकल्याबद्दल 20 मिलियन म्हणजेच सुमारे 164 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आयफोनसोबत चार्जर न देणे हे चुकीचे आहे. असे करणे म्हणजे ग्राहकांना कंपनीचा आणखी एक प्रोडक्ट विकत घ्यायला लावण्यासारखे असल्याचे ब्राझीलमधील एका न्यायाधीशांनी म्हटले. यापूर्वी सप्टेंबरमध्ये, ब्राझीलच्या न्याय मंत्रालयाने याच प्रकरणात Apple ला 2.5 दशलक्ष डॉलर्सचा दंड ठोठावला होता आणि कंपनीला चार्जरशिवाय iPhone 12 आणि iPhone 13 मॉडेल विकण्यास मनाई केली होती. साओ पाउलो सिव्हिल कोर्टाच्या न्यायाधीशांनी ब्राझिलियन ग्राहक संघटनेने दाखल केलेल्या खटल्यात आपला निकाल दिला आहे.

2020 पासून चार्जर नाही
Apple ने ऑक्टोबर 2020 पासून आयफोनसह चार्जर न देण्यास सुरुवात केली. याचा अर्थ असा की कंपनी ग्राहकांना त्यांच्या एका प्रोडक्टचा वापर करण्यासाठी दुसरा प्रोडक्ट घेण्यास भाह पाडत आहे.

गेल्या आठवड्यात, युरोपियन संसदेने 2024 च्या अखेरीस सर्व स्मार्टफोन्स, टॅब्लेट आणि कॅमेर्‍यांमध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट (सिंगल चार्जर स्टँडर्ड) असेल असा नियम पारित केला. बऱ्याच दिवसांपासून अशा बातम्या येत आहेत की Apple आपल्या पुढील iPhone सीरिजमध्ये USB Type-C चार्जर देखील वापरू शकते. परंतु या प्रकरणी कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

 

Web Title: iphone charger not given by apple fined 20 million dollar somewhere 164 crore indian rupees in brazil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.