Join us  

भारताचे नाव जोडताच चीनचा जळफळाट! मेड इन इंडिया iPhone 15 कडे फिरवली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 8:40 AM

अमेरिकन दिग्गज कंपनी अॅपल भारतात आपला आयफोन 15 बनवत आहे.

Apple च्या मोबाईलची चर्चा जगभर नेहमी असते. नुकताच काही दिवसापूर्वी अॅपलने iphone 15 लाँच केला आहे. या फोनच्या खरेदीसाठी लोकांच्यात जगभर उत्साह असल्याचे दिसत आहे, तर दुसरीकडे मात्र चीनने आयफोन 15 च्या खरेदीकडे पाठ फिरवली आहे. iPhone-15 फोन भारतात बनवला जात आहे. चीनच्या हे पचनी पडलेले नाही. चीनमधील लोक या फोनमधील कमतरता शोधण्यात व्यस्त आहेत. चीनमध्ये iPhone 15 ची मागणी मागील मॉडेलच्या तुलनेत खूपच कमी आहे.

लॉन्चच्या पहिल्या दोन आठवड्यांची तुलना केली तर, iPhone 14 च्या तुलनेत iPhone 15 ची विक्री ४.५ टक्के कमी झाली आहे. अॅपलसाठी अमेरिकेनंतर चीन ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. कोरोनाच्या काळात पुरवठ्यातील समस्यांमुळे जगातील अनेक कंपन्या चीनवरील आपले अवलंबित्व कमी करत आहेत. अॅपलने चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारतातही उत्पादन सुरू केले आहे. पाच वर्षांत भारतात पाचपट उत्पादन वाढवण्याची कंपनीची योजना आहे.

या शहरांतील घरेसर्वाधिक फायद्याची; आरबीआयनेच जारी केली यादी...

Apple ने भारतात उत्पन्न वाढवल्याचे चीनला पटलेलं नाही. भारतात बनवलेल्या iPhone 15 स्मार्टफोनला बदनाम करण्यासाठी चीनने प्रयत्न सुरू केले आहेत.  चीनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर भारतात बनवलेल्या iPhone 15 वर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे. काही रिपोर्ट्समध्ये असा दावाही करण्यात आला आहे की, भारतात बनवलेल्या iPhone 15 आणि iPhone 15 Plus मॉडेल्सना युरोप आणि अमेरिकेत विक्रीसाठी बंदी घालण्यात आली आहे. भारतात बनवलेल्या iPhone 15 ची गुणवत्ता खराब असल्याचा दावा केला जात आहे. याशिवाय, फोन गरम होण्याची समस्या देखील असल्याचा आरोप केला जात आहे.

गेल्या काही दिवसापासून चीनच्या अर्थव्यवस्थेबाबत नकारात्मक माहिती समोर येत आहे.चीनचे रिअल इस्टेट क्षेत्र संकटात आहे. देशाच्या जीडीपीमध्ये त्याचा २५ टक्के वाटा आहे. त्यामुळे बँकाही अडचणीत येण्याच्या मार्गावर आहेत. अनेक विकासकांनी पेमेंटमध्ये चूक केली आहे. देशात बेरोजगारी शिगेला पोहोचली आहे, विदेशी गुंतवणूकदार पैसे काढून घेत आहेत, निर्यात कमी होत आहे आणि लोक पैसे खर्च करणे टाळत आहेत. 

टॅग्स :अॅपलचीनभारत