Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता 'TATA' एका क्लिकवर; IPL 2022 च्या मुहुर्तावर टाटा ग्रुपचं नवं अ‍ॅप 'TATA NEU' होणार लाँच

आता 'TATA' एका क्लिकवर; IPL 2022 च्या मुहुर्तावर टाटा ग्रुपचं नवं अ‍ॅप 'TATA NEU' होणार लाँच

या वर्षी आयपीएल २०२२ मध्ये अनेक नव्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. आयपीएलच्या १५ व्या हंगामाचे टायटल स्पॉन्सर (Sponsor of IPL 2022) टाटा समूह असणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 11:56 AM2022-03-15T11:56:41+5:302022-03-15T11:57:02+5:30

या वर्षी आयपीएल २०२२ मध्ये अनेक नव्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. आयपीएलच्या १५ व्या हंगामाचे टायटल स्पॉन्सर (Sponsor of IPL 2022) टाटा समूह असणार आहे.

ipl 2022 before ipl 2022 tata group new app tata neu is ready for launch there will be big marketing in the market report | आता 'TATA' एका क्लिकवर; IPL 2022 च्या मुहुर्तावर टाटा ग्रुपचं नवं अ‍ॅप 'TATA NEU' होणार लाँच

आता 'TATA' एका क्लिकवर; IPL 2022 च्या मुहुर्तावर टाटा ग्रुपचं नवं अ‍ॅप 'TATA NEU' होणार लाँच

TATA IPL 2022 : या वर्षी आयपीएल २०२२ मध्ये अनेक नव्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. आयपीएलच्या १५ व्या हंगामाचे टायटल स्पॉन्सर (Sponsor of IPL 2022) टाटा समूह असणार आहे. टाटा समुह आयपीएलपूर्वी आपलं एक विशेष अॅप लाँच (TATA GROUP Launches New App) करण्याच्या विचारात आहे. ईटीच्या रिपोर्टनुसार या वर्षी आयपीएलदरम्यान, कंपनी सुपर अॅप  ‘TATA NEU’ लाँच करणार आहे. 

७ एप्रिल रोजी कंपनी ‘TATA NEU’ या अॅपची अधिकृत घोषणा करणार असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. आयपीएल २०२२ च्या आसपास एका जबरदस्त मार्केटिंगसोबत हे अॅप लाँच होण्याची शक्यता आहे. टाटानं गेल्या महिन्यांमध्ये टाटा समुहाच्या कर्मचाऱ्यांच्या विशाल पायासाठी पायलट प्रोजेक्ट म्हणून टाटाने गेल्या अनेक महिन्यांत अॅप लाँच केले आहे. दरम्यान, सर्व प्रमुख व्यवसायांना एकत्र करण्यासाठी तयार आहोत. आयपीएलच्या लोकप्रियतेचा वापर करून ‘TATA NEU’ ला पुढील महिन्यात निश्चित स्वरुपात लाँच केलं जाईल, असं टाटा समुहाच्या सूत्रांनी ईटीला सांगितलं.

काय असेल ‘TATA NEU’ मध्ये खास?

  • यामध्ये टाटा समुहाच्या बिगबास्केट. ई फार्मसी 1mg, रिटेलर क्रोमासह सर्वांना ‘TATA NEU’ वर एकत्र आणलं जाईल.
  • याशिवाय अॅपवर एअर इंडिया, एअर एशिया, विस्तारासह टाटा समुहाच्या विमान कंपन्यांची बुकिंग सेवाही दिली जाईल.
  • टाटा क्लिक, टायटन, तनिष्क यांनाही ‘TATA NEU’ या अॅपवर आणलं जाईल. याशिवाय टाटा समुहाचे अन्य व्यवसाय वेस्टसाईड, स्टारबक्स हेदेखील ‘TATA NEU’ वर एकत्र येतील. 

Web Title: ipl 2022 before ipl 2022 tata group new app tata neu is ready for launch there will be big marketing in the market report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.