Join us

Adani Wilmar, Nykaa, Star Health सह सहा कंपन्यांना IPO आणण्यासाठी SEBI ची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 5:20 PM

SEBI नं IPO आणण्यासाठी सहा कंपन्यांना दिली परवानगी.

ठळक मुद्देSEBI नं IPO आणण्यासाठी सहा कंपन्यांना दिली परवानगी.

नायका (Nykaa), अदानी विल्मर (Adani Wilmar) आणि स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्ससह (Star Health and Allied Insurance) सह सहा कंपन्यांना आयपीओ (IPO) साठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडून मान्यता मिळाली आहे. याशिवाय पेन्ना सिमेंट इंडस्ट्रीज, लेटेंट व्ह्यू अॅनालिटिक्स आणि सिगाची इंडस्ट्रीज यांनाही नियामकाकडून IPO साठी मंजुरी मिळाली आहे. या कंपन्यांनी आयपीओसाठी सेबीकडे मे ते ऑगस्ट दरम्यान प्राथमिक कागदपत्रे सादर केली होती. 

कोणत्याही कंपनीला आयपीओ आणण्यासाठी सेबीचा निष्कर्ष आवश्यक आहे. कागदपत्रांनुसार, सौदर्य उत्पादक नायकाचं परिचालन करणारी ऑनलाइन मार्केटप्लेस एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेड, आयपीओअंतर्गत ५२५ कोटी रूपयांचे नवे शेअर्स जारी करण्यात आले आहेत. तर त्याचे प्रवर्तक आणि विद्यमान शेअरधारक ४,३१,११,६७० इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) आणतील. मर्चंट बँकिंग सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार IPO ३,५००-४,००० कोटी रुपये जमवण्याची अपेक्षा आहे.

अदानी विल्मर आयपीओ अंतर्गत ४,५०० कोटी रूपयांचे नवे शे्र्स जारी करणार आहे. तर स्टार हेल्थ अँड अलाइड इन्श्यूरन्स कंपनी आयपीओद्वारे २ हजार कोटी रूपयांचे नवे शेअर्स जारी करेल. लेटेंट व्ह्यू अॅनालिटिक्सच्या आयपीओ अंतर्गत ४७४ कोटी रूपयांचे नवे शेअर्स जारी केले जाणार आहे. तर प्रवर्तक आणि विद्यमान शेअरधारक १२६ कोटी रूपयांचा ओएफएस आणणार आहे. सिगाची इंडस्ट्रीजत्या आयपीओ अंतर्गत ७६.९५ लाख इक्विटी शेअर्सची विक्री केली जाईल. या कंपन्या BSE आणि NSE वर लिस्ट केल्या जातील.

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगगुंतवणूकशेअर बाजार