Join us

‘आयपीओ’ झाेमॅटाेचा पण गुंतवणूक न करता ‘उबेर’ झाली मालामाल; ७०३ काेटी रुपयांचा नफा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 6:31 AM

झाेमॅटाेचा ‘आयपीओ’ ३८ पटींनी सबस्क्राईब झाला हाेता. झाेमॅटाेतील हिश्श्याचे मूल्य ५६०% वाढले 

नवी दिल्ली : तुम्हाला घरपाेच रुचकर आणि चमचमीत पदार्थ घरपाेच पाेहाेचविणाऱ्या ‘झाेमॅटाे’चा ‘आयपीओ’ पहिल्याच दिवशी ६६ टक्क्यांनी वाढला.  मात्र, झाेमॅटाेसह आणखी एका कंपनीने माेठी कमाई केली, तीदेखील एकही पैसा खर्च न करता. ही कंपनी आहे तुम्हाला इच्छीतस्थळी कॅब किंवा ऑटाेद्वारे घरी पाेहाेचविणारी उबेर. 

झाेमॅटाेचा ‘आयपीओ’ ३८ पटींनी सबस्क्राईब झाला हाेता. ताे ७६ रुपयांच्या तुलनेत ११६ रुपयांवर लिस्ट झाला आणि त्यातून गुंतवणूकदारांना श्रीमंत केले. झाेमॅटाेमध्ये उबेरची १० टक्के गुंतवणूक आहे. ‘आयपीओ’च्या लिस्टिंगमुळे उबेरच्या गुंतवणुकीचे मूल्य तब्बल ९ हजार काेटी रुपयांनी वाढले आहे. म्हणजे सुमारे ५६० टक्के नफा उबेरने कमावला आहे. त्यामुळे ‘आयपीओ’तून सर्वाधिक लाभ उबेरला झालेला आहे. भारतीय शेअर बाजारांमध्ये लिस्ट हाेणारी झाेमॅटाे ही पहिली भारतीय ऑनलाइन स्टार्टअप कंपनी ठरली आहे. कंपनीची सुरुवात २०११ मध्ये झाली हाेती.

उबेरला केले मालामालउबेरने झाेमॅटाेमध्ये प्रत्यक्ष गुंतवणूक केली नाही. मात्र, २०२० मध्ये ‘उबेर ईट्स’ला झाेमॅटाेने १३७६ काेटी रुपयांना खरेदी केले. त्यामुळे उबेरला ९.१९ टक्के वाटा मिळाला. या व्यवहारातून उबेर इंडियाने ७०३ काेटी रुपयांचा नफा कमावला, तर आता या ‘आयपीओ’ने कंपनीला अक्षरश: मालामाल केले आहे.

टॅग्स :झोमॅटोउबर