Lokmat Money > बिझनेस न्यूज > IPO News : 'या' IPO चं ग्रँड लिस्टिंग, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट; गुंतवणूकदार मालामाल

IPO News : 'या' IPO चं ग्रँड लिस्टिंग, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट; गुंतवणूकदार मालामाल

कंपनीचे शेअर्स बीएसईवर 90 टक्के प्रीमियमसह 190 रुपयांवर लिस्ट झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 02:20 PM2024-01-29T14:20:46+5:302024-01-29T14:21:35+5:30

कंपनीचे शेअर्स बीएसईवर 90 टक्के प्रीमियमसह 190 रुपयांवर लिस्ट झाले.

IPO News Grand listing of Qualitek Labs IPO double money on first day Investor goods shares now upper circuit | IPO News : 'या' IPO चं ग्रँड लिस्टिंग, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट; गुंतवणूकदार मालामाल

IPO News : 'या' IPO चं ग्रँड लिस्टिंग, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट; गुंतवणूकदार मालामाल

Qualitek Labs IPO: क्वालिटेक लॅबने शेअर बाजारात धमाकेदार एन्ट्री केली आहे. कंपनीचे शेअर्स बीएसईवर 90 टक्के प्रीमियमसह 190 रुपयांवर लिस्ट झाले. कंपनीनं या आयपीओसाठी 100 रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित केला होता. ज्या गुंतवणूकदारांना शेअर्स अलॉट झाले त्या गुंतवणूकदारांनी एका शेअरवर 99.50 रुपयांपर्यंत नफा कमावला आहे. कंपनी बीएसईवर लिस्ट झाली आहे.

लिस्टिंग झाल्यानंतर काही वेळातच कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यानंतर बीएसईमध्ये कंपनीच्या शेअर्सची किंमत 199.50 रुपयांच्या पातळीवर पोहोचली. कामकाजादरम्यान शेअर्सना 199.50 रुपयांच्या स्तरावर अपर सर्किट लागलं.

18 जानेवारीला खुला झालेला आयपीओ 

हा IPO 18 जानेवारी रोजी गुंतवणूकदारांसाठी खुला करण्यात आला. 23 जानेवारीपर्यंत यासाठी अर्ज करता येणार होता. सबस्क्रिप्शन ओपनिंगच्या या 3 दिवसात आयपीओ 65 पटीपेक्षा अधिक सबस्क्राइब झाला. अखेरच्या दिवशी कंपनीला सर्वाधिक 58.95 पट सबस्क्रिप्शन मिळालं होतं.

1200 शेअर्सचा एक लॉट

कंपनीनं 1200 शेअर्सचा एक लॉट तयार केला होता. त्यामुळे गुंतवणूकदारांना किमान 1,20,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागली. IPO पूर्णपणे नवीन इश्यूवर आधारित होता. गुंतवणूकदारांना 19.64 लाख नवीन शेअर्स जारी करण्यात आले आहेत. आयपीओचा आकार 19.64 कोटी रुपये आहे.

आयपीओपूर्वी प्रमोटर्सचं एकूण होल्डिंग 99.99 टक्के होते. तर IPO नंतर स्टेक 73.35 टक्क्यांवर आला आहे. आलोक कुमार अग्रवाल, अंतर्यामी नायक, कमल ग्रोवर आणि TIC सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे कंपनीचे प्रमोटर्स आहेत.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: IPO News Grand listing of Qualitek Labs IPO double money on first day Investor goods shares now upper circuit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.