Lokmat Money > बिझनेस न्यूज > दोन दिग्गज कंपन्यांचे IPO बाजारात येणार, गुंतवणुकदारांना मोठ्या कमाईची संधी मिळणार 

दोन दिग्गज कंपन्यांचे IPO बाजारात येणार, गुंतवणुकदारांना मोठ्या कमाईची संधी मिळणार 

Business News : आरोहन फायनान्शियल सर्व्हिसेस आणि दक्षिण भारतातील एक आघाडीची डेअरी कंपनी असलेली डोडला डेअरी या दोन कंपन्यांना आयपीओ आणण्यासाठी सेबीकडून परवानगी मिळाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 01:52 PM2021-04-27T13:52:56+5:302021-04-27T13:54:33+5:30

Business News : आरोहन फायनान्शियल सर्व्हिसेस आणि दक्षिण भारतातील एक आघाडीची डेअरी कंपनी असलेली डोडला डेअरी या दोन कंपन्यांना आयपीओ आणण्यासाठी सेबीकडून परवानगी मिळाली आहे.

The IPOs of the two giants will come to market, giving investors a chance to make big money | दोन दिग्गज कंपन्यांचे IPO बाजारात येणार, गुंतवणुकदारांना मोठ्या कमाईची संधी मिळणार 

दोन दिग्गज कंपन्यांचे IPO बाजारात येणार, गुंतवणुकदारांना मोठ्या कमाईची संधी मिळणार 

नवी दिल्ली - जर तुम्ही आयपीओच्या माध्यमातून पैसे कमावण्यास इच्छुक असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे. (Business News) दोन आघाडीच्या कंपन्या आपला आयपीओ बाजारात आणत आहेत. आरोहन फायनान्शियल सर्व्हिसेस आणि दक्षिण भारतातील एक आघाडीची डेअरी कंपनी असलेली डोडला डेअरी या दोन कंपन्यांना आयपीओ आणण्यासाठी सेबीकडून परवानगी मिळाली आहे. दोन्ही कंपन्यांच्या शेअर्सची लिस्टिंग एनएसई आणि बीएसईमध्ये होणार आहे. (The IPOs of the two giants will come to market, giving investors a chance to make big money)

मनी कंट्रोल या अर्थविषयक संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार आरोहन फायनान्शियल सर्व्हिसेसने आपल्या आयपीओच्या माध्यमातून १ हजार ७५० ते १८०० कोटी रुपये उभे करण्याची योजना आखली आहे. आरोहन फायनान्शियल सर्व्हिसेस ही आविष्कार ग्रुपकडून प्रमोटेड करण्यात आलेली कंपनी आहे. सेबीमध्ये जमा करण्यात आलेल्या डीआरएचपीनुसार आरोहन फायनान्शियल च्या आयपीओमध्ये ८५० कोटी रुपये फ्रेश इश्शूच्या माध्यमातून उभारले जातील. त्याशिवाय यामध्ये २,७०,५५,८९३ इक्विटी शेअरची ऑफर फॉर सेल सुद्धा येणार आहे. 

आरोहन फायनान्शियल आयपीओच्या फ्रेश इश्शूमधून मिळालेल्या पैशांचा वापर कंपनीचा कॅपिटल बेस वाढवण्यासाठी आणि त्याच्या भविष्यातील आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी करण्यात येईल. TPG Dodla Dairy Holdings Pte Ltd, Dodla Sunil Reddy, Dodla Deepa Reddy आणि Dodla Family Trust कंपनीमध्ये आपल्या होल्हिंगची विक्री करतील. आयपीओमधून मिळवलेल्या पैशांचा वापर कंपनीचे कर्ज फेडण्यासाठी, आवश्यक खर्च भागवण्यासाठी आणि जनरल कॉर्पोरेट पर्पजसाठी केला जाईल. 

तर दक्षिणेतील डेअरी कंपनी डोडला डेअरीच्या आयपीओमध्ये ५० कोटी रुपयांपर्यंतच्या शेअर्सचा फ्रेश इश्शू आणि १०, ०८५, ४४४ इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेलचा समावेश आहे. आयपीओच्या ऑफर फॉर सेलमध्ये समावेश असेल.   

Web Title: The IPOs of the two giants will come to market, giving investors a chance to make big money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.