Join us  

आता बँक खात्यात पैसे जमा आणि काढण्यावरही लागणार चार्ज; १ जानेवारीपासून नवा नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 11:17 AM

देशातील सर्वसामान्यांना महागाईचे चटके बसत असतानाच आता बँकिंग सेवा देखील महाग होणार आहेत. पेट्रोल, डिझेल, खाद्य तेल आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमती वाढलेल्या आहेत.

नवी दिल्ली- 

देशातील सर्वसामान्यांना महागाईचे चटके बसत असतानाच आता बँकिंग सेवा देखील महाग होणार आहेत. पेट्रोल, डिझेल, खाद्य तेल आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमती वाढलेल्या आहेत. आता बँकिंग सेक्टर देखील ग्राहकांना मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) ग्राहकांवर आता अतिरिक्त भार लावणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत जर तुमचं बेसिक सेव्हिंग, सेव्हिंग किंवा करंट अकाऊंट आहे तर तुम्हाला खात्यात पैसे जमा करण्यासाठी तसंच पैसे काढण्यासाठी देखील अतिरिक्त चार्ज आकारला जाणार आहे. 

१ जानेवारी २०२२ पासून इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून दिल्या जाणाऱ्या विविध सेवांसाठी ग्राहकांकडून चार्ज वसुल करणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेंच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार आयपीपीबीच्या बेसिक सेव्हिंग अकाऊंटमधून दर महिन्याला जास्तीत जास्त चार वेळा विनाशुल्क पैसे काढता येणार आहेत. त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारासाठी शुल्क आकारले जाणार आहे. 

मर्यादेपेक्षा अधिक व्यवहार केल्यासही लागणार चार्जइंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या सेव्हिंग आणि करंट अकाऊंटमधून दरमहा २५ हजार रुपयांपर्यंत पैसे ग्राहक विनाशुल्क काढू शकतात. पण एका महिन्यात तुम्ही तुमच्या खात्यातून २५ हजार रुपयांहून अधिक पैसे काढत असाल तर तुमच्या व्यवहारांवर शुल्क आकारलं जाणार आहे. यात २५ हजार रुपयांच्या मर्यादेवरील प्रत्येक व्यवहारासाठी २५ रुपयांपर्यंतचं शुल्क आकारलं जाणार आहे. याशिवाय जीएसटी देखील आकारला जाईल. पैसे काढण्याच्या पर्यायांमध्ये यात एटीएम विड्रॉवल, आरटीजीएस, एनईएफटी, ऑनलाइन ट्रान्सफर, ईएमआय ट्रान्झाक्शन इत्यादींचा समावेश आहे. नव्या नियमांबाबतची संपूर्ण माहिती तुम्हाला नजिकच्या शाखेत जाऊन बँक अधिकाऱ्यांकडून घेता येऊ शकेल. 

पैसे जमा करण्यावरही शुल्क आकारणीइंडिया पोस्ट पेमेंट बँकेतील खात्यातून पैसे काढण्यासोबतच आता खात्यात पैसे जमा करण्यासाठी देखील शुल्क आकारलं जाणार आहे. भारतीय टपाल खात्याच्या बँकिंग सेवेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकाला आपल्या खात्यात दरमहा केवळ १० हजार रुपये जमा करता येऊ शकतात. १० हजार रुपयांची मर्यादा ओलांडली गेल्यास त्यावरील प्रत्येक डिपॉझिटसाठी २५ रुपये सेवाकर आकारला जाणार आहे. याशिवाय प्रत्येक व्यवहारावर जीएसटी देखील वसुल केला जाणार आहे. त्यामुळे तुमचं जर इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खातं असेल तर नवे नियम समजून घेऊनच व्यवहार करणं जास्त सोयीचं आणि फायदेशीर ठरणार आहे. 

टॅग्स :पोस्ट ऑफिसबँकिंग क्षेत्र