Join us

इथं मिळतंय सर्वात स्वस्त पेट्रोल-डिझेल, ५ रुपयांत २ लिटर, आपल्याकडे पाण्याची बॉटलही चारपट महाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 15:05 IST

cheapest petrol : तुम्हाला अशा देशाबद्दल माहिती आहे का जिथे पेट्रोल आणि डिझेलचे दर पाण्याच्या किमतीपेक्षा स्वस्त आहेत? इथं १ लिटर पेट्रोलची किंमत ०.०२९ डॉलर म्हणजेच २.४५ रुपये प्रति लिटर आहे.

cheapest petrol : गेल्या काही वर्षात देशातील महागाईने नवीन उच्चांक गाठले आहेत. कधीकाळी ३० ते ४० रुपयांना मिळणाऱ्या पेट्रोलने कधीच शंभरी पार केली आहे. राष्ट्रीय तेल विपणन कंपन्या भारतात दररोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर अपडेट करतात. कधी पेट्रोल-डिझेलचे भाव वाढतात, तर कधी पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या आजच्या किमतींबद्दल बोलायचे झाले तर मुंबईत आज पेट्रोलची किंमत १०३.४४ रुपये प्रति लीटर आहे. तर डिझेलचा दर ८९.९७ रुपये प्रतिलिटर आहे. पण तुम्हाला अशा देशाबद्दल माहिती आहे का, जिथे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पाण्याच्या किमतीपेक्षा स्वस्त आहेत. होय तुम्ही बरोबर वाचलत. आपल्याकडे १ लिटर पाण्याच्या बाटलीची किंमत सरासरी २० रुपये आहे. पण या देशात तुम्ही २ लिटर पेट्रोल फक्त ५ रुपयांना विकत घेऊ शकता.

२ लीटर पेट्रोल ५ रुपयांनाइराणमध्ये तुम्ही २ लीटर पेट्रोल फक्त ५ रुपयात खरेदी करू शकता. जगात इराण हा एकमेव देश आहे जिथे पेट्रोल खूप स्वस्त आहे. इराणमध्ये १ लिटर पेट्रोलची किंमत ०.०२९ डॉलर म्हणजेच २.४५ रुपये प्रति लिटर आहे. भारतात ही किंमत ९४.७२ रुपये प्रति लिटर आहे.

इराणमधील डिझेलची किंमतइराणमध्ये डिझेलही खूप स्वस्त आहे. इराणमध्ये पेट्रोलच्या तुलनेत डिझेलची किंमत कमी आहे. इराणमध्ये डिझेलची किंमत प्रति लिटर ०.००४ डॉलर म्हणजेच ०.३४ रुपये प्रति लिटर आहे. इराणमध्ये तुम्ही ३ लिटर डिझेल फक्त १ रुपयात खरेदी करू शकता. तर भारतात ही किंमत ८७.६२ प्रति लिटर आहे.

पेट्रोल-डिझेल महागणार?आंतरराष्ट्रीय बाजारात, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल ७३.१२ डॉलर वर व्यापार करत आहे, तर WTI क्रूड प्रति बॅरल ६८.८७ डॉलर वर व्यापार करत आहे. तर, भारताबद्दल बोलायचे झाले तर, सरकारी तेल कंपन्यांनी आज २१ नोव्हेंबर २०२४ रोजीही सर्व महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत.

मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्ये आज पेट्रोलचे दर किती आहेत?आज नवी दिल्लीत पेट्रोलचा दर ९४.७७ रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोलचा दर १०३.४४ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर १०४.९५ रुपये प्रति लिटर आहे. त्याचवेळी, चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर १००.८० रुपये आहे.

टॅग्स :पेट्रोलपेट्रोल पंपखनिज तेलइराण