Join us  

इराण-इस्रायल युद्धादरम्यान कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या; पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 11:24 AM

Crude Oil Prices: इराण-इस्त्रायल संघर्षादरम्यान, पुन्हा एकदा कच्चा तेलाच्या किमती घसरल्या आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Iran-Israel War : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर एक चांगली बातमी समोर आली आहे. इराण-इस्रायल युद्धादरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण पाहायला मिळत आहे. WTI क्रूडमध्ये १.२० टक्क्यांच्या घसरणीनंतर प्रति बॅरल ७४.६५ डॉलरचा दर दिसत आहे. याशिवाय, आंतरराष्ट्रीय बेंचमार्क म्हणजेच ब्रेंट क्रूड १.२१ टक्क्यांनी स्वस्त झाले असून ते प्रति बॅरल ७८.०८ डॉलरच्या दरापर्यंत घसरले आहे. अशात पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.

उत्तर इस्रायलवर हिजबुल्लाचा हल्लाइस्रायली अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल्लाने रविवारी बिन्यामिनाजवळील आयडीएफ तळावर ड्रोन हल्ला केला. उत्तर इस्रायलच्या बिन्यामिना शहरात ४ इस्रायली सुरक्षा दलाचे सैनिक ठार झाले असून डझनभर जखमी झाल्याचे वृत्त आहे. यापूर्वी इस्रायलने हिजबुल्लाच्या प्रमुख नेत्याची हत्या घडवून आणली होती.

कच्च्या तेलाच्या दरातील चढ-उतारांसोबत भारताची रननिती काय? इराण-इस्त्रायलमध्ये संघर्षाची ठिणगी पडण्यापूर्वी कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये लक्षणीय स्थिरता दिसून येत होती. दर घसरत असल्याने भारतातही पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची अपेक्षा निर्माण होऊ लागली होती. मात्र, मध्यपूर्वेत युद्धाची आग भडकताच, कच्च्या तेलाच्या किमती भडकल्याच्या बातम्या येऊ लागल्या. ही बातमी भारतीयांसाठी नकारात्मक होती. त्यातच सध्या सरकार देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याच्या स्थितीत नाही, अशी माहिती सरकारी सुत्रांनी दिली. कारण कच्च्या तेलाच्या किमतीत जर अशीच वाढ झाली तर भविष्यात देशातील नागरिकांना त्याच्या आगीपासून वाचवावे लागेल.

इराणवरील अवलंबित्व कमी

भारत सध्या आपल्या गरजेच्या ४० टक्के तेल रशियाकडून आयात करतो. इराणमधून तेलाची आयात खूपच कमी आहे. या कारणामुळे भारतात अचानक दहशतीची परिस्थिती निर्माण होईल अशी अपेक्षा नाही. पण सरकार या उपायांचाही विचार करत आहे. सध्या केंद्र सरकार कच्च्या तेलाच्या दरात वाढ होण्याची शक्यता नाकारत नाही. त्यामुळे कच्च्या तेलात सुरू असलेल्या चढ-उतारांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना तेल विपणन कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. कच्चे तेल महाग झाल्यानंतर रुपयात घसरण होण्याची शक्यता आहे. सर्वसामान्य लोकांना पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सध्या तरी दिलासा मिळणार नाही. निवडणुकीचा विचार केला तर महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुका पाहिल्या तर इंधनदरात कपात होऊ शकते.

भू-राजकीय तणावाचा भारतावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. परंतु, आरबीआयने चलन धोरण बैठकीनंतर सांगितले आहे की ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. इराण-इस्रायल युद्धाच्या प्रभावामुळे रुपयाची घसरण होणार नाही याची काळजी सेंट्रल बँक घेत असून इतर अनेक उपाययोजनांवरही काम सुरू आहे.

टॅग्स :खनिज तेलपेट्रोलडिझेलइंधन दरवाढ