Lokmat Money > बिझनेस न्यूज > इराणमध्ये एका डॉलरसाठी लागतात १,१२,००० रिआल

इराणमध्ये एका डॉलरसाठी लागतात १,१२,००० रिआल

इराण समोरील आर्थिक संकट अधिकाधिक गंभीर बनत जात असताना त्याच्या चलनाची घसरण वेगाने होत आहे. रविवारी इराणचे चलन रिआल एका अमेरिकन डॉलरला १,१२,००० एवढे घसरले. शनिवारी ते ९८,००० होते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:14 AM2018-07-30T00:14:42+5:302018-07-30T00:15:14+5:30

इराण समोरील आर्थिक संकट अधिकाधिक गंभीर बनत जात असताना त्याच्या चलनाची घसरण वेगाने होत आहे. रविवारी इराणचे चलन रिआल एका अमेरिकन डॉलरला १,१२,००० एवढे घसरले. शनिवारी ते ९८,००० होते.

Iran needs $ 1,12,000 for a dollar | इराणमध्ये एका डॉलरसाठी लागतात १,१२,००० रिआल

इराणमध्ये एका डॉलरसाठी लागतात १,१२,००० रिआल

तेहरान : इराण समोरील आर्थिक संकट अधिकाधिक गंभीर बनत जात असताना त्याच्या चलनाची घसरण वेगाने होत आहे. रविवारी इराणचे चलन रिआल एका अमेरिकन डॉलरला १,१२,००० एवढे घसरले. शनिवारी ते ९८,००० होते.
इराण सरकारने रिआलचा डॉलरशी विनिमयाचा दर ४४,०७० एवढा ठेवला होता तो यावर्षी एक जानेवारी रोजी ३५,१८६ एवढा होता. रिआलने स्वत:चे मोल अवघ्या चार महिन्यांत डॉलरच्या तुलनेत निम्म्याने गमावले. गेल्या मार्च महिन्यात रिआल ५० हजारांवर गेला होता. सरकारने एप्रिल महिन्यात ४२ हजार असा दर निश्चित करण्याचा प्रयत्न केला व काळा बाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची धमकी दिली. परंतु, इराणशी व्यापारी संबंध सतत सुरू असलेल्यांना त्याच्या प्रदीर्घ काळपासून खालावत चाललेल्या आर्थिक व्यवस्थेची काळजी वाटली व त्यांनी आपली बचत सुरक्षित राहावी यासाठी रिआल आणखी खाली जाईल या आशेने डॉलरमध्ये गुंतवणूक केली. कृत्रिमरित्या कमी केलेल्या दराने बँकांनी त्यांच्याकडील डॉलर विकायला नकार दिल्यावर सरकारला गेल्या जून महिन्यात आपली भूमिका नरम करायला भाग पडले व ठराविक आयातदारांच्या गटांबाबत लवचिक धोरण त्याने मान्य केले.
इराणचे मध्यवर्ती बँकेचे प्रमुख वलिवुल्लाह सैफ यांना अध्यक्ष हासन रुहानी यांनी गेल्या आठवड्यात पदावरून दूर करण्याचे कारण आर्थिक संकटाची हाताळणी हेच होते. २०१५ मध्ये इराणशी झालेल्या अणु करारातून बाजुला होण्याची घोषणा अमेरिकेने गेल्या मे महिन्यात केल्यापासून रिआलची घसरण सुरू झाली. २०१५ मधील करारामुळे इराणवरील काही निर्बंध रद्द झाले होते. आता अमेरिका यावर्षी ६ आॅगस्ट व ४ नोव्हेंबर रोजी इराणवर दोन टप्प्यांत पूर्ण स्वरुपाचे निर्बंध लागू करणार आहे. पर्यायाने इराणशी अनेक विदेशी कंपन्यांना व्यावसायिक संबंध तोडावे लागतील.

Web Title: Iran needs $ 1,12,000 for a dollar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Iranइराण