नवी दिल्ली : सध्याच्या काळात बहुतेक लोक रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी आयआरसीटीसी (IRCTC) अॅपची मदत घेतात. याद्वारे रेल्वे तिकीट बुकिंग प्रक्रिया अतिशय सोपी झाली आहे. तिकीट बुकिंग प्रक्रिया फक्त 5 ते 6 टप्प्यांत पूर्ण होते. दरम्यान, काही दिवसांतच उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत. अशा परिस्थितीत या सुट्यांमध्ये लोक मोठ्या संख्येने रेल्वेने प्रवास करण्याचे ठरवतात.
अशावेळी रेल्वेच्या कन्फर्म तिकिटासाठी आधीच बुकिंग करण्यासाठी धावपळ करावी लागते. मात्र, आता IRCTC च्या ऑनलाइन तिकिट बुकिंगमुळे प्रवाशांची धावपळ कमी झाली आहे. दरम्यान, रेल्वे तिकीट बुक करण्याव्यतिरिक्त तुम्हाला IRCTC च्या वेबसाइटवर अनेक लाभ मिळतात. याबाबत जाणून घ्या....
ही विशेष सुविधा IRCTC वेबसाइटवरून तिकीट बुकिंगवर उपलब्ध आहे...
- वेबसाइटवरून बुकिंग केल्यावर प्रवाशांना दिव्यांग कोट्यावर विशेष सवलत मिळते.
- जर तुम्ही रेल्वे पास वापरत असाल तर त्यावरही विशेष सवलत मिळते.
- तुम्ही तुमच्या गरजेनुसार वेगवेगळ्या तारखांना आरक्षणाची Avability तपासू शकता.
- त्या मार्गाची ट्रेन आणि त्यामध्ये असलेल्या सीटची माहिती आधीच मिळवता येते.
- तसेच तुम्ही तत्काळ आणि प्रीमियम तत्काळची सुविधा घेऊ शकता.
IRCTC वेबसाइटवर अकाउंट कसे तयार करावे?
- सर्वात आधी तुम्ही अधिकृत वेबसाइट irctc.co.in ला भेट द्या.
- नवीन अकाउंट तयार करण्यासाठी Register ऑप्शनवर क्लिक करा.
- एक Register फॉर्म ओपन होईल. तो पूर्ण भरा.
- यामध्ये तुमचे नाव, युजर नेम, जन्मतारीख इत्यादी भरावे लागेल.
- सर्व आवश्यक माहिती भरा आणि सबमिट बटणवर क्लिक करा.
- यानंतर IRCTC चे अकाउंट तयार होईल. यासंबधीचा मेसेज तुमच्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर येईल.